Join us  

चक्क फिल्मफेअरचा पुरस्कार घेण्यास नकार दिला होता या अभिनेत्रीने, वाचा काय आहे हे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 7:00 PM

फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ही अभिनेत्री स्टेजवर आली. पण तिने हा पुरस्कार स्वीकारण्यास चक्क नकार दिला.

ठळक मुद्देदेवदासच्या आयुष्यात जितके महत्त्व पारोचे आहे, तितकेच चंद्रमुखीचे देखील आहे. त्यामुळे मला पुरस्कार द्यायचा असेल तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा द्यावा. अन्यथा मला पुरस्कार देऊच नका...

देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसह बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री वैजयंती माला यांचा नुकताच म्हणजेच 13 ऑगस्टला वाढदिवस झाला. वैजयंती माला यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांनी चक्क एक पुरस्कार नाकारला होता. वैजयंती माला यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. पण तो पुरस्कार स्वीकारणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.

वैजयंती माला यांनी 50 आणि 60च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी दाक्षिणात्य इंडस्ट्रीद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील चांगलाच जम बसवला होता. बिमल रॉय यांच्या देवदास या चित्रपटात वैजयंती माला झळकल्या होत्या. त्यांनी या चित्रपटात चंद्रमुखी तर सुचित्रा सेन यांनी पारोची भूमिका साकारली होती तर देवदासच्या भूमिकेत दिलीप कुमार दिसले होते.

वैजयंती माला यांना देवदास या चित्रपटातील चंद्रमुखी ही भूमिका अतिशय चांगल्याप्रकारे साकारल्याबद्दल फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला होता. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर वैजयंती माला स्टेजवर आल्या. पण त्यांनी स्टेजवर आल्यावर हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की, देवदासच्या आयुष्यात जितके महत्त्व पारोचे आहे, तितकेच चंद्रमुखीचे देखील आहे. त्यामुळे मला पुरस्कार द्यायचा असेल तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा द्यावा. अन्यथा मला पुरस्कार देऊच नका...

वैजयंती माला यांनी पाचव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.  त्यानंतर वयाच्या 13 व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आणि 1951 मध्ये ‘बहार’ या सिनेमाद्वारे त्या हिंदी सिनेसृष्टीकडे वळल्या. पण त्यांना खरी ओळख दिली ती नागीन आणि देवदास या चित्रपटांनी. 1968 मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. 1969 मध्ये रिलीज झालेला ‘प्रिन्स’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

टॅग्स :वैजयंती मालाफिल्मफेअर अवॉर्ड