Join us  

विवेक अग्नीहोत्रींनी केला खुलासा, सांगितलं काय असेल 'द दिल्ली फाइल्स' या त्यांच्या नव्या सिनेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:36 AM

The Delhi Files : 'द दिल्ली फाइल्स' कशावर आधारित असेल, त्यात काय-काय दाखवलं जाणार यावरून विवेक अग्नीहोत्री यांनी पडदा उठवला आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमा बनवून चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक रंजन अग्नीहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी आता एक नवीन फाइल उघडण्याची घोषणा नुकतीच केली. ते आता 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) हा सिनेमा घेऊन येणार आहेत. 'द दिल्ली फाइल्स' कशावर आधारित असेल, त्यात काय-काय दाखवलं जाणार यावरून विवेक अग्नीहोत्री यांनी पडदा उठवला आहे. निर्मात-दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी रविवारी त्यांच्या आगामी द दिल्ली फइल्स सिनेमाबाबत डिटेल्स सांगितले. ते म्हणाले की सिनेमा १९८४ च्या काळ्या अध्यायाबाबत असेल, इतकंच नाही तर यात तामिळनाडूबाबतही सांगितलं जाईल.

न्यूज एजन्सी एएनआयसोबत बोलताना विवेक म्हणाले की, '१९८४ हे साल भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय आहे. ज्याप्रकारे पूर्ण पंजाबमध्ये दहशतवादाची पूर्ण स्थिती सांभाळली गेली, ती अमानवीय होती. हे पूर्णपणे वोट बॅंकचं राजकारण होतं आणि यासाठी पंजाबमध्ये कॉंग्रेसकडून दहशतवादाची शेती करण्यात आली. आधी त्यांनी ते तयार केले नंतर त्यांना नष्ट केलं. मग त्यांनी अनेक निर्दोष लोकांना मारलं आणि ते दाबलं गेलं. आजपर्यंत न्याय मिळाला नाही. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं'.

ते म्हणाले की, जर लोकांना इतिहास सांगितला जाईल आणि तथ्य सांगितलं जातील तर लोक स्टॅंड घेतील आणि न्याय मागतील. विवेक अग्नीहोत्री म्हणाले की, द दिल्ली फाइल्समध्ये तुम्हाला तामिळनाडूबाबतही सत्य सांगितलं जाईल. ते दिल्लीबाबत नसेल. मुघल राजांपासून इंग्रजांपर्यंत आधुनिक काळापर्यंत दिल्लीवर शासन करणाऱ्यांनी सगळं काही नष्ट केलं.

अग्नीहोत्री म्हणाले की, भारतात लोक आपल्या राजकीय अजेंड्याच्या आधारावर इतिहास लिहितात. पण तो तथ्यावर आधारित असला पाहिजे. भारताचा राजकीय अजेंडा जास्तकरून पश्मिनी धर्मनिरपेक्ष अजेंडा राहिला आहे. महान हिंदू संस्कृतीची नेहमीच उपेक्षा केली जाते आणि असं मानलं जातं की, आपण कमजोर लोक आहोत. 

दरम्यान विवेक अग्नीहोत्री यांनी १५ एप्रिलला घोषणा केली होती की, ते त्यांच्या नवीन प्रोजेक्ट 'द दिल्ली फाइल्स' वर लवकरच काम सुरू करतील. द काश्मीर फाइल्सचे निर्माता-दिग्दर्शक विवेक यांनी ट्विटरवरून द काश्मीर फाइल्स पाहणाऱ्यांचे आभार मानले होते.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी