Join us

उर्वषीचा सुपर हॉट लुक व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 22:12 IST

‘सनम रे’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली सुपरहॉट अभिनेत्री आणि मॉडेल उर्वषी रौतेला ही सध्या खुप चर्चेत आहे. 

‘सनम रे’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली सुपरहॉट अभिनेत्री आणि मॉडेल उर्वषी रौतेला ही सध्या खुप चर्चेत आहे. तिला ‘सनम रे’ मुळे अनेक असाईनमेंट्स मिळाल्याचे ती सांगते. तिच्या हॉट लुकचाही चित्रपटाच्या हिट होण्यात यशाचा वाटा आहे.तिने तिचा वाढदिवसही त्याच आनंदात साजरा केला की, त्यावेळी तिला अनेक दिग्दर्शकांनी आगामी प्रोजेक्टससाठी विचारणा केली होती. त्यानंतर तिने तिच्या फिटनेस आणि तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. तिला तिच्या अभिनयाने आणि दिसण्याने कुणालाही नाराज करावयाचे नाहीये.त्यामुळे ती सध्या जास्तीत जास्त वेळ फिटनेस वर्कआऊटमध्ये घालवतांना दिसतेय. नुकताच तिचा एक हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिला आगामी एक अ‍ॅक्शन चित्रपट मिळाला असून अद्याप त्याविषयी काही सांगता येणार नाही असे तिने सांगितले आहे.