Join us  

पहिल्याच भेटीत विराट कोहलीचा जोक ऐकून चिडली होती अनुष्का! वाचा, विरूष्काच्या पहिल्या भेटीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 11:38 AM

सन 2017 मध्ये विराट व अनुष्काने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर विराट कोहलीने अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. 

ठळक मुद्देविराट कोहलीने हनिमूनचा एक इंटरेस्टिंग किस्साही सांगितला.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण म्हणून तिच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. पती विराट कोहलीमुळे ती सतत चर्चेत असते. सन 2017 मध्ये विराट व अनुष्काने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर विराट कोहलीने अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. होय, अमेरिकन होस्ट ग्राहम बेनसिंगरच्या ‘डेप्थ विद ग्राहम बेनसिंगर’ या टॉक शोमध्ये विराटने अनुष्काशी आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, ‘2003 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान मी अनुष्काला पहिल्यांदा भेटलो होतो. माझा मॅनेजर बंटी याने मला या शॅम्पूच्या जाहिरातीबद्दल सांगितले. मी उत्सूक होतो. माझ्यासोबत या जाहिरातीत कोण आहे? असे बंटीला मी विचारले. यावर अनुष्का शर्मा असे तो म्हणाला आणि मी उडालोच. मला विश्वास होईना. इतक्या मोठ्या अभिनेत्रीसोबत मी अ‍ॅक्टिंग कशी करणार, मी तिच्यासोबत कसा दिसणार, या प्रश्नांनी मला दडपण आणले. पण बंटीने मला सांत्वना दिली.

शूटींगच्या दिवशी अनुष्का आली. मी मनातून खूप घाबरलेला होता. मनावरचे दडपण कमी करण्यासाठी मी अनुष्काची थोडी गंमत केली. ती सेटवर आली तेव्हा माझ्यापेक्षा उंच दिसत होती. ते पाहून, तुला यापेक्षा अधिक उंच हिल्सच्या चपला मिळाल्या नाहीत का? असा प्रश्न मी तिला केला.  ती यावर काहीशी चिडलेली दिसली.  पण मी गमतीत ती गोष्ट बोललो हे मी तिला लगेच सांगितले. खरे तर मी ते बोलायला नको होते. माझा विनोद माझ्यावर उलटला. मग तर मला आणखी टेन्शन आले. तिला शूटींगची सवय होती. पण मला अजिबात अनुभव नव्हता. तिच्यापुढे मी जणू मी मूर्ख होतो,’ असे विराटने यावेळी सांगितले.

हनिमूनचा किस्साविराट कोहलीने यावेळी हनिमूनचा एक इंटरेस्टिंग किस्साही सांगितला. त्याने सांगितले की, लग्नानंतर आम्ही फिनलँडला हनिमूनला गेलोत. आम्हाला कुणीच ओळखणार नाही, असे ठिकाण आम्हाला हवे होते. म्हणून आम्ही फिनलँडची निवड केली होती. आम्ही एका कॉफीशॉपमध्ये गेलो. आम्हाला इथे कुणीच ओळखत नाही, या आनंदात आम्ही होतो. पण कॉफीशॉपमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक शिख व्यक्ती बसलेली होती.

 

मी लगेच माझा चेहरा कॉफीच्या मगने लपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आम्हाला ओळखलेच. तो आमच्याजवळ आला आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. माझे आडनावसुद्धाकोहली आहे, असे म्हणाला. आमच्यासाठी हे अनपेक्षित आणि मजेशीर होते. जगात एखादे तरी ठिकाण आहे का, जिथे कोणीच आम्हाला ओळखू शकणार नाही, असा विचार करून मी व अनुष्का खूप हसलो होतो.

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा