Join us  

विराट कोहली एकटाच भारतात परतला, तर अनुष्का कायमची लंडनमध्ये स्थायिक होणार? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:21 PM

'विरुष्का'च्या चाहत्यांमध्ये संभ्रम

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्येच आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने मुलगा 'अकाय'ला जन्म दिला. त्याआधीपासूनच ते लंडनमध्ये होते. आता त्यांना तिकडे जाऊन जवळपास 5 महिने झाले आहेत. तर आता विराट कोहली एकटाच मुंबईत परतला असून त्याच्यासोबत अनुष्का आणि मुलं आलेली नाहीत. त्यामुळे आता विराट आणि अनुष्का मुलांसोबत लंडनमध्येच स्थायिक होणार आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

विराट-अनुष्का लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. त्यांचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.अनुष्काने लेकाला जन्म दिल्यानंतर तर अकायच्या नावाने हजारो सोशल मीडिया अकाऊंट्स सुरु झाले. अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी विराट कोहलीही मॅच सोडून अनुष्कासोबत लंडनमध्येच होता. लंडनमधील विराटचा लेक वामिकासोबतचा रेस्टॉरंटमधील एक फोटो व्हायरल झाला होता. विराट अनुष्का कधी भारतात परत येतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं. पण विराट एकटाच आला असल्याने आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. कोहली कुटुंब कायमचं लंडनमध्ये स्थायिक झालं की काय असे प्रश्न युझर्सला पडले आहेत. 

विराट कोहली IPL 2024 साठी परत आला आहे. पुन्हा बाबा होणार असल्याने तो नुकत्याच झालेल्या टेस्ट मॅचही खेळला नाही. एकाने विराटच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'विराट तर परत आला पण बहुतेक आयपीएलनंतर ते कायमचे यूकेला शिफ्ट होणार आहेत'. तर आणखी एकाने लिहिले,'पैसा असेल तर यूकेमधलंही आयुष्य एकदम पीसफुल असतं.' अनुष्का मागेच एका मुलाखतीत म्हणाली होती की मुलांच्या जन्मानंतर ती काम सोडून हाऊसवाईफ होईल. काही जणांनी विराटवर टीकाही केली आहे. आधी तर बायकोसाठी देश सोडला आणि आता आयपीएलसाठी बायकोला सोडून आला. 

विराट आणि अनुष्का शर्माची लंडनमध्ये प्रॉपर्टी आहे. अकाय जन्म लंडनमध्ये झाला म्हणून त्याला तेथील नागरिकता मिळेल असा त्याचा अर्थ होत नाही. तिथल्या नियमांनुसार, तेथील नागरिकता घेण्यासाठी दोन्ही पालकांमधील कोण्या एकाकडे यूकेची नागरिकता हवी. किंवा पालक बऱ्याच वर्षांपासून  तिथले रहिवासी हवेत तरच मुलाला नागरिकता मिळू शकते.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीलंडनबॉलिवूड