Join us  

Virushka : विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:33 AM

विराट कोहलीने त्याच्या सुट्ट्या पूर्णपणे खाजगी ठेवल्या आहेत. मात्र तरी विरुष्काच्या मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे.

Virushka : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटपासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) कृष्णनगरी वृंदावनला पोहोचला आहे. विराट आणि अनुष्काचे वृंदावनमधील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. विराट कोहलीने त्याच्या सुट्ट्या पूर्णपणे खाजगी ठेवल्या आहेत. यावेळी तो केवळ धार्मिक दौऱ्यावर असून त्या दोघांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र तरी विरुष्काच्या मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या दौऱ्यादरम्यान बाबा नीम करोरी यांच्या आश्रमात पोहोचले. येथील व्यवस्थापकाने सांगितले की, विराट आणि अनुष्का सध्या धार्मिक दौऱ्यावर आहेत. ते दोघे बुधवारी दुपारी वृंदावनला पोहोचणार होते, मात्र दोघेही नियोजित वेळेच्या सुमारे तीन तास आधी येथे पोहोचले. विराट आणि अनुष्का यांनी बाबा नीम करोरी आश्रमाला भेट दिली. समाधीवर पोहोचल्यानंतर त्यांनी ध्यानही केले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जवळपास 1 तास आश्रमात थांबले.

वामिकाचा क्युट व्हिडिओ व्हायरल 

विराट आणि अनुष्का दोघेही आश्रमात दर्शन घेत होते.  यावेळी अनुष्काच्या मांडीवर बसलेली वामिका मस्ती करताना दिसली. तर अनुष्का तिला सांभाळत होती. आणि विराट कोहली कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. यानंतर विराटने वामिकाला कडेवर घेतले आणि तिला बाहेर घेऊन जाताना दिसला. या व्हिडिओत वामिकाचा चेहरा लपवण्यात आला आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. वामिकाची झलक आजपर्यंत फक्त एकदाच चाहत्यांनी बघितली आहे. वामिकाचे फोटो व्हिडिओ घेऊ नका यासाठी विराट आणि अनुष्का नेहमीच आग्रही असतात.

विराट कोहलीने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. कोहली नुकताच बांगलादेश दौऱ्यावरून परतला आहे. त्याने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिकाही खेळली होती. सध्या कोहली वनडेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने चितगाव वनडेमध्ये 113 धावांची दमदार शतकी खेळीही खेळली.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती भारतीय संघाने या नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेने केली आहे. मात्र या मालिकेत विराट कोहलीची निवड झाली नाही. या मालिकेतून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पण टी-20 नंतर टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही होणार आहे. या मालिकेसाठी कोहलीची संघात निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :विरूष्काविराट कोहलीअनुष्का शर्मासोशल मीडियाव्हायरल फोटोज्