Join us  

 पापा विनोद मेहरांइतकाच स्टाईलिश आहे रोहन मेहरा! ‘बाजार’मधून करतोय डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 8:41 PM

रोहन मेहरा ‘बाजार’मधून बॉलिवूड डेब्यू करतोय. रोहन दुसरा कुणी नाही तर लोकप्रीय अभिनेते दिवंगत विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. 

सैफ अली खान स्टारर ‘बाजार’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अलाहाबादेतून मुंबईत येऊन नशीब आजमावणारा ‘रिजवान अहमद’चे मुख्य पात्रही यात आहे. पण हे पात्र साकारणारा अभिनेता कोण आहे, हे फार क्वचित जणांना रिजवान ठाऊक असेल. या अभिनेत्याचे बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्याशी जवळचे नाते आहे.

होय, ‘रिजवान अहमद’चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे, रोहन मेहरा. रोहन मेहरा ‘बाजार’मधून बॉलिवूड डेब्यू करतोय. रोहन दुसरा कुणी नाही तर लोकप्रीय अभिनेते दिवंगत विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. होय, विनोद मेहरा यांची तिसरी पत्नी किरण मेहरा रोहनची आई आहे. रोहनला सोनिया नावाची एक बहीणही आहे. ‘व्हिक्टोरिया 203’, ‘रागिनी एमएमएस’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तिने काम केले आहे. पण यापश्चात तिला बॉलिवूडमध्ये फार यश मिळू शकले नाही आणि तिने एमटीव्ही व्हीजे बनने पसंत केले.

सोनियानंतर रोहन मेहरा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्याने मल्टिस्टारर चित्रपटाची निवड केली आहे.

हा चित्रपट रोहनला किती यश मिळवून देतो ते बघूच. पण सध्या रोहन त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चा आहे. होय, करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या तारा सुतारियासोबतच्या रोहनच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत. तारा आणि रोहन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे कळतेय. रोहनने आपल्या सोशल अकाऊंटवर तारासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

लूक्स आणि स्टाईलच्या बाबतीत रोहन आपल्या पित्यापेक्षा म्हणजेच विनोद मेहरांपेक्षा कुठेही कमी नाही. ‘बाजार’च्या ट्रेलरमध्ये त्याच्यातील अभिनयाचे कसबही दिसतेय. आता केवळ स्टार किड्सच्या गर्दीत रोहन आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख कशी निर्माण करतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 

 

टॅग्स :विनोद मेहरासैफ अली खान