Join us  

 रेखाशी अफेअर अन् तीन लग्नं...! वाचा, विनोद मेहरांची रिअल लाईफ स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 8:00 AM

विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

ठळक मुद्दे विनोद मेहरा यांचे लग्न झाले होते. पण असे असतानाही अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्यावर विनोद मेहरांचा जीव जडला.

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा. बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावले होते. त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकिर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले.  

विनोद मेहरा यांची बहीण शारदा चित्रपटांत सहअभिनेत्रींच्या भूमिका करायची. तिच्यामुळेच  ‘रागिणी’ या चित्रपटात विनोद मेहरा यांना किशोर कुमार यांच्या लहानपणीची भूमिका मिळाली होती. यावेळी ते केवळ 13 वर्षांचे होते. पुढे  बेवकूफ आणि  अंगुलीमाल  या चित्रपटातही विनोद मेहरा बालकलाकार म्हणून दिसले होते. पण असे असले तरी अ‍ॅक्टिंगमध्ये विनोद मेहरा यांना फार रस नव्हता.

 1965 मध्ये विनोद मेहरांनी एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीत मार्केटींगची नोकरी पत्करली. याचवर्षी   यूनायटेड प्रोड्यूसर्स फिल्मफेयर टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काही मित्रांनी विनोद मेहरा यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार केले. ही स्पर्धा जिंकणाºयासाठी मॉडेलिंग आणि बॉलिवूडचे दरवाजे उघडले जाणार होते. साहजिकच स्पर्धा चुरसीची होती.  मित्रांच्या आग्रहावरून विनोद मेहरा या स्पर्धेत सहभागी झालेत. एकापेक्षा एक स्मार्ट, डॅशिंग, हँडसम तरूणांना मागे टाकत विनोद मेहरा ही स्पर्धा जिंकणार तोच अंतिम फेरित दुसºयाच एका स्पर्धकाने बाजी मारली आणि विनोद मेहरा यांना दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. विनोद मेहरा यांना मात देणाºया या स्पर्धकाचे नाव होते राजेश खन्ना. होय, राजेश खन्ना यांनी टॅलेंट हंट स्पर्धा जिंकली आणि पुढे ते बॉलिवूडचे सुपरस्टार बनले. चित्रपटात येण्यापूर्वी विनोद मेहरा माकेर्टींग एक्झिक्युटीव्ह होते. एकेदिवशी रेस्टॉरंटमध्ये निर्माता शौरी यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी आपल्या ‘एक थी रिता’ या चित्रपटासाठी विनोद मेहरा यांना आॅफर दिली. या चित्रपटात त्यांची हिरोईन होती,अभिनेत्री तनुजा.  यानंतर विनोद मेहरा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

विनोद मेहरांच्या करिअरची गाडी सूसाट पळत असताना इकडे त्यांच्या आईला त्यांच्या लग्नाची चिंता सतावू लागली. विनोद आईचा शब्द टाळत नसत. आईच्या इच्छेखातर विनोद यांनी मीना ब्रोका हिच्यासोबत लग्न केले. याचदरम्यान चोर पावलांनी आलेल्या हृदयरोगाने त्यांना ग्रासले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत विनोद यांना हृदयविकाराचा पहिला धक्का आला. यातून ते थोडक्यात बचावले. 

 विनोद मेहरा यांचे लग्न झाले होते. पण असे असतानाही अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्यावर विनोद मेहरांचा जीव जडला. मग काय, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विनोद मेहरा यांनी बिंदियासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत  बिंदियाने  अचानक दिग्दर्शक जेपी दत्तासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि विनोद मेहरा यांना घटस्फोट दिला.

बिंदियाला घटस्फोट दिल्यानंतर एकाकी पडलेले विनोद मेहरा अभिनेत्री रेखाच्या जवळ आले.  रेखासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा  त्यावेळी होती. अर्थात रेखा वा विनोद मेहरा यांनी कधीच याची कबुली दिली नाही.  यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, रेखा विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही  हाकलवून लावले होते. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून  निघून गेल्या.  विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. 

आईच्या म्हणण्यावरून विनोद मेहरांनी रेखासोबतचे नाते तोडत तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.  १९८८ मध्ये त्यांनी किरणसोबत लग्न केले.  किरणपासून विनोद मेहरा यांना रोहन आणि सोनिया अशी दोन मुले झालीत. पण या लग्नानंतर दोनच वर्षांत विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. ३० आॅक्टोबर १९९० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

विनोद निर्मिती क्षेत्रातही उतरले. ‘गुरुदेव’या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. यात ऋषीकपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अर्थात हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा धक्का आला. 

 

विनोद निर्मिती क्षेत्रातही उतरले. ह्यगुरुदेवह्ण या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. यात ऋषीकपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अर्थात हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा धक्का आला. ३० आक्टोबर १९९० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

टॅग्स :विनोद मेहरारेखा