विद्या बालन बनली सेंसर बोर्डची सदस्य, चित्रपटांना येणार का अच्छे दिन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 14:47 IST
सेंसर बोर्डामध्ये कालपासून अनेक फेरबदल होताना दिसतायेत. आधी सेंसर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या ...
विद्या बालन बनली सेंसर बोर्डची सदस्य, चित्रपटांना येणार का अच्छे दिन ?
सेंसर बोर्डामध्ये कालपासून अनेक फेरबदल होताना दिसतायेत. आधी सेंसर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लेखक आणि गीतकार प्रसून जोशी यांची वर्णी लागली आहे. यानंतर सेंसर बोर्डासच्या सदस्यांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती विद्या बालन हिचे नाव सामील झाले आहे. याबाबतचा आनंद व्यक्त करताना विद्या म्हणाली, ''मला आशा आहे मी ही जबाबदारी समर्थपणे संभाळू शकते. तसेच मला मिळालेल्या संधीबद्दल मी खूपच उत्साहित आहे.'' निहलानी यांनी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांना आतापर्यंत कात्री लावल्या आहेत. त्यामुळे विद्या बालनची निवड ही सगळ्यात आतापर्यंतची घेण्यात आलेली बोल्ड स्टेप मानली जाते आहे. विद्या बालन आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात झळकली आहे. विद्या बालन 'फ्रीडम ऑफ स्पीच' वर विशेष ठेवते.ALSO READ : सेन्सॉरच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांची गच्छंती; आता प्रसून जोशींकडे धुरा!विद्याला 'द डर्टी पिक्चर' मधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. विद्याने मोठ्या पडद्यावर स्मिताची भूमिका जीवंत केली होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. 'द डर्टी पिक्चर' बॉलिवूडमधल्या बोल्ड चित्रपटांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या बेगम जानमध्ये ही विद्या बोल्ड अंदाजातच दिसली होती. याचित्रपटावर सेंसरने कात्री चालवली होती. त्यामुळे चित्रपटातला कात्री लागण्याचे दु:ख काय असते हे विद्याला माहिती आहे. याकारणामुळे चित्रपट मेकर्सना विद्याच्या सेंसर बोर्डची सदस्यांमध्ये वर्णी लागल्यामुळे अनेक आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता चित्रपटांवर आधीसारखे 46 किंवा 89 कट लागणार नाहीत तसेच चित्रपट तयार करताना मेकर्सना बिनधास्तपणे विषयाची निवड करता येईल.