Join us  

Video: बॉयफ्रेंडसोबतचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना सुश्मिताने दिला रिलेशनशीपबाबत खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:12 AM

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

अभिनेत्री सुश्मिता सेन बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.  दोघे दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करतायेत. सुष्मिता अनेकवेळा रोहमनसोबत वर्कआऊट करताना दिसते. सुश्मिताने एका नवा वर्कआऊट करताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला वारंवार बघितले जाते आहे. 

लॉकडाऊनमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यामध्ये सुश्मिता कोणतीच कसर सोडत नाहीय. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओत दोघे टफ वर्कआऊट करताना दिसतायेत. सुश्मिता सेनने हा व्हिडीओ शेअर करताना रिलेशनशीपबाबत एक खास सल्ला सुद्धा दिला आहे. या व्हिडीओमध्ये वर्कआऊट करताना दोघांचा बॅलेन्स स्पष्ट दिसतोय. 

सुश्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले, ''रोहमन शॉल आय लव्ह यू...एका स्थिर नात्यासाठी संतुलन, लवचिक मन, परस्पर सामर्थ्य आणि विश्वासाची आवश्यक असते.'' २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. अद्याप अविवाहित असेलेली सुश्मिता दोन मुलींची आई आहे. तिने या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. दीर्घकाळापासून ती मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल