Join us  

Video:अमिताभ बच्चन यांच्या फोटोसमोर उभे राहून पोज देत होत्या रेखा, पाठीवळून पाहिल्यानंतर दिली अशी Reaction

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:26 AM

जेव्हा -जेव्हा रेखा यांचा विषय येतो तेव्हा -तेव्हा अमिताभ यांचा रेखा यांच्याशी असलेला सिलसिला नाही आठवला तरच नवल. आता पुन्हा एकदा रेखा आणि अमिताभ ही जोडी चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे हा खास व्हीडीओ.

अमिताभ आणि रेखा यांचा सिलसिला जगजाहिर आहे. अगदी सुरुवातीपासून अमिताभ आणि रेखाच्या अफेयरच्या खुमासदार चर्चा रंगल्या...प्रत्येकवेळी त्याची चर्चा झाली.. खुद्द रेखानंही एका जुन्या मुलाखतीमध्ये अमिताभबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र जयाशी रेशीमगाठीत अडकल्यावर सिलसिलानंतर दोघांनीही एका सिनेमात काम केलं नाही. असं असलं तरी नशिबाचा खेळ म्हणा किंवा योगायोग... पुरस्कार सोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम दोघांचीही नजरानजर होतेच. जेव्हा -जेव्हा रेखा यांचा विषय येतो तेव्हा -तेव्हा अमिताभ यांचा रेखा यांच्याशी असलेला सिलसिला नाही आठवला तरच नवल. आता पुन्हा एकदा रेखा आणि अमिताभ ही जोडी चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे हा खास व्हीडीओ.

त्याचे झाले असे की, नुकतेच फोटोग्राफर डब्बु रत्नानीने कॅलेंडर लॉन्च केले. यावेळी वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपल्या खास स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. मात्र या सा-यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते रेखा यांनी. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये  डब्बु रत्नानी यांच्या बच्चेकंपनीसह मस्त फोटो काढण्यात व्यस्त दिसत आहे. हे झाल्यानंतर त्यांनी खास मीडियाला फोटो देण्यासाठी एका जागी उभ्या राहतात. त्याचवेळी त्या  पाठीवळून  पाहतात तर  तिथे अमिताभ यांचा फोटो लावलेला दिसतो. अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथून निघून जातात. मात्र जरा रेखाची ही अदा पहा... जसं काही झालंच नाही अशा आविर्भावात पाहायला मिळतात. अमिताभ यांचा फोटो पाहून थबकलेल्या रेखा यांची ही गोंधळलेली अवस्था मात्र मीडियाच्या कॅमे-यात कॅप्चर झाली आहे. सध्या रेखा यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  हा व्हीडीओ पाहून नेटीझन्स मात्र आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हीडीओ जरा जया बच्चन यांनाही दाखवा. तुर्तास या व्हीडीओमुळे पुन्हा एकदा प्रत्यक्षरित्या-अप्रत्यक्षरित्या अमिताभ-रेखाचा सिलसिला संपला नाही तर तो सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चन