Join us  

video : पाहा, इटलीच्या रस्त्यावर डिम्पल कपाडिया यांचा बेधूंद डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:55 AM

रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्युझिशियनने त्याच्या वाद्यावर ‘बॉबी’ या चित्रपटातील एका गाण्याची धून छेडली आणि डिम्पल कपाडिया स्वत:ला रोखू शकल्या नाहीत.

कल्पना करा, विदेशातील एखाद्या छोट्याशा गावातील दुपार...याठिकाणी रस्त्याच्या कडेला बसलेला  एक म्युझिशियन...अचानक त्याच्या वाद्यातून तुमच्या आवडत्या गीताची धून छेडली जाते...आणि तुम्ही सगळे काही विसरून तिथेच थिरकायला लागता...असेच काहीसे घडते ते अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांच्याबद्दल.होय, डिम्पल कपाडिया सध्या अक्षय कुमारच्या   कुटुंबासोबत इटलीत सुट्टीचा आनंद घेत आहेत.इटलीतील एका छोट्याशा खेड्यात दुपारचीच वेळ. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्युझिशियनने त्याच्या वाद्यावर ‘बॉबी’ या चित्रपटातील एका गाण्याची धून छेडली आणि डिम्पल कपाडिया स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. सगळे काही विसरून त्याही थिरकायला लागल्या. अक्षय कुमारने हा सुंदर क्षण कॅमेºयात कैद केला आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला.

‘बॉबी’ हा डिम्पल यांचा पहिला चित्रपट़ साहजिकच या चित्रपटाशी त्यांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. एका विदेशी कलाकाराने नेमक्या याच चित्रपटाचे गाणे ऐकवल्यानंतर डिम्पल कपाडियांचा आनंद गगणात मावेनासा झाला. व्हिडिओत त्यांच्या चेहºयावरचा हा आनंद आपण स्पष्टपणे दिसतो आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

‘बॉबी’ च्या यशानंतर डिंपल यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या होत्या. पण, त्यांनी सर्व ऑफर्स नाकारत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

टॅग्स :डिम्पल कपाडियाअक्षय कुमार