Join us  

सुशांत सिंग राजपूतच्या सुसाइडनंतर विकी कौशलची पोस्ट होतेय खूप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:33 AM

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बरेच कलाकार शोक व्यक्त करत आहेत. या दरम्यान विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये विकी कौशल गोल्डन टेम्पलच्या बाहेर प्रार्थना करताना दिसतो.  विकी कौशलने सोशल मीडियावरनंतर त्याने गोल्डन टेम्पलच्या बाहेर प्रार्थना करतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, जे आहे...जे सोडून गेले...सर्वांना सुख शांति दे.

विकी कौशलच्या या पोस्टला सुशांत सिंगचा संदर्भ चाहते जोडत आहे. सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.

आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतविकी कौशल