Join us  

Vdya Sinha's Funeral: विद्या सिन्हा यांच्यावर अंत्यसंस्कार, टीव्ही इंडस्ट्रीची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:24 AM

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल गुरुवारी निधन झाले. कालच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देकाव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल गुरुवारी निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. विद्या सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार, फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगतात शोककळा पसरली. कालच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी हजर होते. ‘कुल्फी कुमार बाजेबाला’ ही विद्या सिन्हा यांची अखेरची मालिका. या मालिकेचा लीड अ‍ॅक्टर मोहित मलिक याने विद्या यांचे अंत्यदर्शन घेतले.

अभिनेता सुनील पाल, अभिनेता अयुब खान यावेळी दिसले. विद्या सिन्हा यांनी  छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांत काम केले.

काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ मुंबई येथे झाला.  विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माते होते.  वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी ‘मिस मुंबई’चा किताब जिंकला होता.  १९७४ साली आलेला ‘रजनीगंधा’ व ‘छोटीसी बात’ हे त्यांचे दोन सिनेमे प्रचंड गाजलेत. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले होते.  विद्या सिन्हा यांनी ‘बिजली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. बहू रानी, हम दो हैं ना,भाभी आणि कवंजल सारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले.  विद्या सिन्हा यांनी २००१ मध्ये आॅस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंके यांच्या बरोबर दुसरे लग्न केले. मात्र कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला.  

टॅग्स :विद्या सिन्हा