चोखंदळ रसिकांच्या मनातले ज्यांचे स्थान अढळ असते, अशा दुमिर्ळ कलाकारांपैकी एक म्हणजे सुलभाताई. त्यांच्या रंगभूमी, विशेषत: प्रायोगिक रंगभूमीवरच्या निष्ठेचा राज्य सरकारने नुकताच 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करून गौरव केला. 'रंगायन' विखुरल्यानंतर अरविंद देशपांडे, अरुण काकडे आणि पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर यांनी 'आविष्कार' ही नाट्यसंस्था काढली. सुलभा देशपांडे आणि माधव साखरदांडे यांनी 'आविष्कार'च्या 'चंदशाला' या बालरंगभूमीची धुरा सांभाळली. 'बाबा हरवले आहेत', 'राजा राणीला घाम हवा' यासारख्या बालनाटकांची त्यांनी निमिर्ती केली. पार्वतीकुमार यांच्या मदतीने 'दुर्गा झाली गौरी'सारखे नृत्यनाट्य उभे केले. बालरंगभूमीच्या निमित्ताने देशविदेशातील बालरंगभूमीचा अभ्यास केला. छबिलदास शाळेतील शिक्षिका ते समर्थ नाट्यकमीर्, प्रगल्भ अभिनेत्री असे संपन्न व्यक्तिमत्त्व सुलभाताईंना लाभले. प्रायोगिक रंगभूमीवर त्या निष्ठेने काम करत राहिल्या. त्यामानाने व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे आगमन उशिरा झाले. विजय तेंडुलकरांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे'तील बेणारे बाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली. व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय कारकीर्द भरात असताना अरविंद देशपांडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सुलभाताईंनी अरुण काकडे यांच्या साथीने 'आविष्कार' कार्यरत ठेवली. समविचारी नाट्यसंस्था, समूहांच्या एकत्रित चळवळीला 'छबिलदास चळवळ' म्हणून मिळालेल्या लौकिकात सुलभाताईंचा सहभाग महत्त्वाचा आहे. १९५०च्या दशकात स्पर्धांमधून रंगभूमीवर आलेल्या सुलभाताईंना व्यावसायिक रंगभूमी खुणावत होती. तरी त्यांनी प्रायोगिकतेची कास सोडली नाही. व्यावसायिक नाटके आणि चित्रपटांतून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. भूमिका, जैत रे जैत, विजेता, सलाम बॉम्बे अशा सिनेमांमधून तसेच टीव्ही मालिकांमध्येही त्या भेटल्या. संगीत नाटक अकादमी, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान, रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
भूमिका केलेले चित्रपट :
अब इंसाफ़ होगा (१९९५)अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)आदमी खिलौना है (१९९३)इजाज़त (१९८७)एक फूल तीन कांटे (१९९७)कस्तूरी (१९८०)कॉमन मॅन (१९९७) (टी.व्ही.)कारोबार (२०००)क्रोध (१९९०)खून भरी मांग (१९८८)गमन (१९७८)गुलाम-ऐ-मुस्तफा (१९९७)गैर (१९९९)घर द्वार (१९८५)घर हो तो ऐसा (१९९०)चौकट राजा (१९९१)चौराहा (१९९४)जादू का शंख (१९७४)जान तेरे नाम (१९९२)जानू (१९८५)जैत रे जैत (१९७७)डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)तमन्ना (१९९७)तमाचा (१९८८)तरंग (१९८४)त्रिदेव (१९८९)द फिल्म (२००५)दर्पण के पीछे (२००५)दिल आशना है (१९९२)दुनिया (१९८४)दुश्मन देवता (१९९१)बदलते रिश्ते (१९९६) टीव्ही मालिकाबाज़ार (१९८२)भीगी पलकें (१९८२)भीष्म (१९९६)भूमिका (१९७७)भैरवी (१९९६)मन (१९९९)मान्सून (२००६)मिस्टर आज़ाद (१९९४)मोक्ष: साल्वेशन (२००१)यह कैसा इंसाफ़ (१९८०)याराना (१९९५)युगपुरुष (१९९८)राजा की आयेगी बारात (१९९७)रामनगरी (१९८२)लोरी (१९८४)विजेता (१९८२)विरासत (१९९७)शंकरा (१९९१)शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१)संध्या छाया (१९९५) (टीव्ही)सलाम बोम्बे! (१९८८)सितम (१९८२)सुर संगम (१९८५)हमला (१९९२)हेच माझं माहेर (१९८४)
दिग्दर्शित चित्रपट :
राजा रानी को चाहिए पसीना (१९७८)