Join us  

सलमान, माझी मदत कर...! भाईजानच्या हिरोईनला कोरोनाचा धोका, टेस्ट करायलाही नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:13 PM

कोरोनाची टेस्ट करायलाही तिच्याकडे पैसे नाहीत. अशास्थितीत तिने पुन्हा सलमानकडे मदतीची याचना केली आहे.

ठळक मुद्देपूजा सध्या तिच्या गोव्यतल्या घरी आहे. तिचा पतीही आजारी आहे. तो आजारी असल्याने तिला त्याची सेवाही करावी लागत आहे.

बॉलिवूडची दुनिया जितकी झगमगती वाटते तितकाच जवळून काळोख असतो. जोपर्यंत तुम्ही टीव्हीवर दिसत असता तो पर्यंतच लोक तुम्हाला विचारतात. ज्यादिवशी तुमच्याकडेच फेम निघून जाते तुमची तुम्हाला कोणीच ओळखत नाही. असेच काहीसे घडले आहे सलमान खानच्या ‘वीरगती’ चित्रपटातील अभिनेत्रीसोबत. होय, अभिनेत्री पूजा डडवालला 2018 मध्ये टीबीशी आणि फुप्फुसांच्या आजाराने ग्रासले होते. तिच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. अशास्थितीत सलमान खान तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला होता. त्याने पूजाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलत तिला या आजारातून बरे होण्यास मदत केली होती. या आजारातून पूजा बरीही झाली होती. पण आता पुन्हा पूजा एका नव्या संकटात सापडली आहे.

तिची तब्येत मागच्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तिला मागच्या एका आठवड्यापासून सर्दी-खोकला आणि श्वसनाचा त्रास होत आहे. याशिवाय घशात खवखव, ताप आणि अशक्तपणा सुद्धा आहे.  ही सर्व लक्षण कोरोना व्हायरसची असल्याने तिची चिंता वाढली आहे. पण कोरोनाची टेस्ट करायलाही तिच्याकडे पैसे नाहीत. अशास्थितीत तिने पुन्हा सलमानकडे मदतीची याचना केली आहे.

पूजा सध्या तिच्या गोव्यतल्या घरी आहे. तिचा पतीही आजारी आहे. तो आजारी असल्याने तिला त्याची सेवाही करावी लागत आहे. याशिवाय घरातील सर्व काम एकटीलाच करावी लागत आहेत. अशात तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुजाने सांगितले की, घरातले सामान संपले आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत. याआधी अनेक मित्र-मैत्रिणींकडून पैसे उधार घेतल्याने आता त्यांच्याकडून मदत मिळणेही बंद झाले  आहे. मागच्या काही दिवसांपासून माझी तब्येत खूप बिघडत चालली आहे. सर्वात आधी मला खोकला सुरू झाला. त्यानंतर ताप यायला लागला. मागच्या काही दिवसांपासून गोव्यातले वातावरण थंड आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे माझी तब्येत बिघडली आहे.  

  मला जी लक्षण आहेत ती सामान्यत: कोरोना पॉझिटीव्ह लोकांमध्ये दिसून आली आहेत. मलाही भीती वाटते मात्र माझ्यााकडे कोरोना टेस्ट करण्याएवढे पैसे नाहीत. कोणाकडून उधार पैसे घेऊन मी उपाचार घेऊ शकत नाही. कदाचित वातावरणातील बदलाचा परिणाम आहे मी काही दिवसांतच ठिक होईन.

पूजा या मुलाखतीत म्हणाली, मी याआधीही सलमानकडे मदत मागितली आहे. त्यांनी मदत सुद्धा केली. मुंबईमध्ये 6-8 महिने माझ्यावर उपचार केले आणि त्यानंतर गोव्यात माझ्या राहण्याची व्यवस्था केली. आज मी पुन्हा एकदा सलमानकडे मदत मागत आहे. खरं तर त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा मदत मागणे मलाही ठिक नाही वाटत पण त्यांच्याशिवाय माझी कोणीच मदत करणार नाही हे माहित आहे. आज पुन्हा एका माडियाच्या माध्यमातून सांगते, सलमान मी संकटात आहे कृपया माझी मदत करा. 

टॅग्स :सलमान खान