Join us

​वरूण म्हणतो, हे खरे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 10:26 IST

‘दिलवाले’ने निराश केल्यानंतर अभिनेता वरूण धवनने दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यावर कायमची फुली मारली असल्याचे वृत्त अलीकडे मीडियात उमटले होते. ...

‘दिलवाले’ने निराश केल्यानंतर अभिनेता वरूण धवनने दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यावर कायमची फुली मारली असल्याचे वृत्त अलीकडे मीडियात उमटले होते. मात्र खुद्द वरूणने या वृत्ताचा इन्कार केला आहे. ‘दिलवाले’नंतर मी रोहित शेट्टीसोबत पुढे कधीही काम करणार नाही, ही शुद्ध खोटी बातमी आहे. हे खरे नाही. मला रोहितसोबत काम केल्याचा आनंद आहे. एक दिग्दर्शक म्हणून रोहित मला आवडला,आवडतो आणि आवडत राहील, असे वरूणने स्पष्ट केले. वरूणने रोहित शेट्टीच्या ‘राम लखन’ या चित्रपटासाठी नकार दिल्याचे वृत्त मीडियात उमटले होते.