Join us

वरुण - श्रद्धाच्या अभिनयाची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:41 IST

डान्सच्या चाहत्यांसाठी सोनी टीव्हीवर डान्स ब्लॉकबस्टर एबीसीडी-2 चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर शो 10 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता होणार आहे. ...

डान्सच्या चाहत्यांसाठी सोनी टीव्हीवर डान्स ब्लॉकबस्टर एबीसीडी-2 चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर शो 10 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता होणार आहे. 2013 साली प्रदर्शित एबीसीडीनंतर एबीसीडी-2 हा चित्रपट निर्माता व कलावंतासाठी यश मिळवून देणारा ठरला होता. 2015 मध्ये हॉटेस्ट ओपनिंगचे सारे रेकॉर्ड मोडित काढले होते. या चित्रपटात वरुण धवन व श्रद्धा कपूर यांचा अप्रतिम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट मुंबईतील एका फिक्शन (काल्पनिक) डान्स अकादमीच्या सत्य कथेवर आधारित आहे. भारतातील लहान शहारापासून ते अमेरिकेतील लॉस वेगास येथील डान्स कॉम्पिटेशनचे विजेतेपदाचा मान मिळविण्याची कथा यात आहे. वरुण धवनचा अभिनय व श्रद्धा कपूरचा डान्स चाहत्यांना भूरळ घालणारा आहे. यातील गीते देखील श्रवणीय आहेत.