Join us

वरुण धवनची पुतणी अंजनी धवनचा पुन्हा दिसला ग्लॅमर अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:52 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, त्यांचे कुटुंबीय खासकरुन त्यांची मुलं-मुली यांच्या जोरदार चर्चा असतात. या सेलिब्रिटींची मुलं काय करतात, सिनेमातील त्यांची ...

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, त्यांचे कुटुंबीय खासकरुन त्यांची मुलं-मुली यांच्या जोरदार चर्चा असतात. या सेलिब्रिटींची मुलं काय करतात, सिनेमातील त्यांची कामगिरी, त्यांच्या जीवनात घडणा-या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशाह शाहरुख खानच्या लेकीचे फोटो व्हायरल होतात. तर कधी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातीची चर्चा होते. मात्र सध्या एका अशी मुलीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती कुण्या अभिनेता-अभिनेत्रीची लेक नाही. सध्या तरुणाईच्या विशेषतः तरुणींच्या मनावर गारुड घालणारा सुपरस्टार वरुण धवनशी या मुलीचा संबंध आहे. आता ही मुलगी आहे तरी कोण असा तुम्हाला विचार पडला असेल. आम्ही बोलतोय वरुण धवन याच्या पुतणीविषयी.वरुण जितका स्मार्ट आणि हँडसम आहे तितकीच त्याची पुतणीही तितकीच लक्ष वेधून घेणारी आहे. वरुणच्या या पुतणीचं नाव अंजनी धवन असं असून तिचं वय अवघं 16 वर्षे आहे. धवन कुटुंबीयांची लाडकी असणा-या अंजनीने आपलं सौंदर्य आणि घायाळ करणा-या अदांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अंजनी ही वरुण धवनच्या काकाच्या मुलाची लेक आहे.अंजनी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर बरीच एक्टिव्ह असते. आपले बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाजातले बरेच फोटो अंजनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. सध्या अंजनीचे इन्स्टाग्रामवर 25 हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आपल्या काकाप्रमाणेच म्हणजेच वरुणप्रमाणेच त्याची पुतणी अंजनीही सध्या तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे.