Join us  

कुणी वरूण धवनला ट्रोल करा रे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 9:39 PM

सोशल मीडियावर ट्रोल होणे कुणाला आवडेल? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल होणे जराही आवडत नाही. अनेकांनी तर यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. पण बॉलिवूडचा एक स्टार असाही आहे, ज्याला कुणीच ट्रोल करत नाही, याचे टेन्शन येते. 

सोशल मीडियावर ट्रोल होणे कुणाला आवडेल? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल होणे जराही आवडत नाही. अनेकांनी तर यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. पण बॉलिवूडचा एक स्टार असाही आहे, ज्याला कुणीच ट्रोल करत नाही, याचे टेन्शन येते. होय, आम्ही बोलतोय ते वरूण धवनबदद्ल. वरूण धवन सध्या ‘सुई धागा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे आणि या प्रमोशनदरम्यान अनेक मजेदार गोष्टी तो शेअर करतोय. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ या चित्रपटाच्या रिलीजदरम्यान वरूण धवन चांगलाच ट्रोल झाला होता. इतका की, यानंतर त्याने सोशल मीडियापासून लांब राहणे पसंत केले होते. वर्षभरापूर्वी त्याने ट्विटरवरून ब्रेक घेतला होता. अर्थात यानंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर परतला आणि परतलाचं नाही तर ट्रोलिंग एन्जॉय करू लागला. आता तर ही स्थिती आहे की, कुणी ट्रोल केले नाही की, तो बेचैन होतो. एका मुलाखतीदरम्यान खुद्द वरूणनेच हा खुलासा केला. मी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो, तेव्हा मला समाधान मिळते. मी चांगले काम करतोय, असे मला वाटते. बरेच दिवस ट्रोल झालो नाही की, माझी मलाच चिंता वाटायला लागते, असे वरूण धवन यावेळी म्हणाला.माझे सोशल अकाऊंट मी स्वत: सांभाळतो़ त्यामुळे अनेकदा माझ्या हातून चुका होतात, असेही तो म्हणाला.

सुई-धागा’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या ‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत.   ‘सुई-धागा’ या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.  

 

टॅग्स :वरूण धवनसुई-धागा