Join us  

वरुण धवन पोहोचला 'मादाम तुसा'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:24 AM

काही महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की अभिनेता वरुण धवनच्या मेणाचा पुतळा 'मादाम तुसा' म्युझियममध्ये उभा राहणार आहे. याआधी एक हाँगकाँगच्या 'मादाम ...

काही महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की अभिनेता वरुण धवनच्या मेणाचा पुतळा 'मादाम तुसा' म्युझियममध्ये उभा राहणार आहे. याआधी एक हाँगकाँगच्या 'मादाम तुसा' म्युझियमची एक टीम मुंबईत येऊन वरुणचे माप सुद्धा घेऊन गेली होती. आता वरुणचा पुतळा लंडनच्या  'मादाम तुसा' म्युझियममध्ये उभारण्यात आला आहे. आपल्या फोटोसोबत वरुण धवनने फोटो सुद्धा काढले आहेत. यावेळी त्याच्यासोबत वडिल डेविड धवन आणि आईसुद्धा हजर होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसतो आहे.  याआधी या म्युझिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे पुतळे सुद्धा उभारण्यात आले आहेत.   वरुणच्या चित्रपटातील करिअरबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो इंडस्ट्रिमधील अनेक मोठ्या नावांना टक्कर देतो आहे. सध्या वरुण त्याचा आगामी चित्रपट 'सुई धागा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो अनुष्का शर्मासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. नुकताच त्यांनी  शूजित सरकारच्या ‘अक्टूबर’ चित्रपटाची शूटिंग केली आहे. ‘अक्टूबर’ या  चित्रपटाचीदेखील इतर चित्रपटांप्रमाणे वेगळी आणि हटके कथा आहे. वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा शुजीत यांना सुचली होती. वरुण धवनभोवती या चित्रपटाची कथा फिरते. तसेच हा हॉलिवूडचा चित्रपट 'हर'वर आधारित असल्याचे देखील बोलले जातेय. यानंतर वरुण 'किक २'मध्ये सलमानसोबत दिसणार आहे. साजिद नाडीयादवालाने 'किक २' बद्दल दोघांशी बोलणी सुद्धा सुरु केली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.   तसेच एप्रिलमध्ये वरुण धवनचा अक्टूबर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्या अपोझिट बनिता संधू हा नवा चेहरा दिसणार आहे. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘अक्टूबर’ या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना  वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत  सरकार  ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल.ALSO READ :  वरुण धवनने शेअर केला सिक्स पॅक अ‍ॅब्स दिसत असलेला फोटो; तापसी पन्नूने लिहिले, ‘जरा खात-पित जा’!