Join us  

VIDEO : समांथाला फोटोग्राफर्सने घेरलं अन् वरूण धवनने तिला प्रोटेक्ट केलं, म्हणाला - अरे तिला घाबरवू नका ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 3:49 PM

Varun Dhawan-Samantha Ruth Prabhu : वरूण आणि समांथा राज आणि डीकेच्या आगामी सीरीज सिटाडेलमध्ये दिसणार आहेत. या संदर्भात त्यांची भेटही झाली होती.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनला (Varun dhawan) त्याच्या केअरिंग नेचरसाठी खूप पसंत केलं जातं. गेल्या रात्री वरूण धवन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री समांथा रूथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) स्पॉट करण्यात आलं. यावेळी वरूणने ज्याप्रकारे समांथाला फोटोग्राफर्सच्या गर्दीत प्रोटेक्ट केलं, त्याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं जात आहे. 

वरूण आणि समांथा राज आणि डीकेच्या आगामी सीरीज सिटाडेलमध्ये दिसणार आहेत. या संदर्भात त्यांची भेटही झाली होती. दोघेही अंधेरीमध्ये स्पॉट झाले होते. साऊथ आणि बॉलिवूडमधील या दोन मोठ्या स्टार्सना पाहून फोटोग्राफर्सनी त्यांना घेरलं होतं. हे बघून वरूण फोटोग्राफर्सना म्हणाला की, समांथाला घाबरवू नका. 

त्यानंतर वरूण तिला प्रोटेक्ट करत गाडीपर्यंत घेऊन गेला. ज्याप्रकारे त्याने समांथाला प्रोटेक्ट केलं ते सर्वांनाच भावलं आहे. लोक वरूणच्या या वागण्याला स्वीट म्हणाले. एकाने कमेंट केली की, वरूण फार हंबल आहे. त्याचं मन चांगलं आहे. लोक वरूणचं भरभरून कौतुक करत आहे.

तेच समांथाच्या फॅन्सने वरूणचे आभार मानले. सिटाडेलबाबत सांगायचं तर यात समांथा मुख्य भूमिकेत असेल. याआधी समांथा राज आणि डीकेच्या 'फॅमिली मॅन २'मध्ये दिसली होती. त्यातील तिच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. आता नव्या प्रोजेक्टसाठी वरूण आणि समांथा काही ट्रेनिंग घेतील. फॅन्स दोघांनाही एकत्र बघण्यासाठी आतुर आहेत. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीवरूण धवनबॉलिवूड