Join us  

लग्नाच्या चर्चांवर वरुण धवनने केला खुलासा, म्हणाला लग्न करणार पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 5:33 PM

Varun Dhawan - Natasha Dalal's Wedding : येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वरुण आणि नताशा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरुण आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दोघे ही लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचे कळतेय. मात्र हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुण धवन लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लगावला आहे. एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे वरुणने सांगितले आहे. याआधी अनेक वेळा वरुणने लग्न करणार पण तारीख माहिती नाही असे सांगितले होते.     

वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात. 

 वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर वरूण धवन-श्रद्धा कपूर सोबत ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा  रेमो डिसूजा दिग्दर्शित करतोय. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल