Join us

वरूण धवनने या कारणांमुळे स्विकारला 'जुडवा 2'सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 14:21 IST

रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी प्रेम आणि राजा परत येत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं मनमुराद मनोरंजन करण्यासाठी प्रेम ...

रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी प्रेम आणि राजा परत येत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं मनमुराद मनोरंजन करण्यासाठी प्रेम आणि राजा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरत आहेत.- काही वर्षांपूर्वी जुडवा सिनेमातून दबंग सलमान खानने प्रेम आणि राजा बनून रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं होतं. आता हीच जादू रसिकांवर पुन्हा करण्यासाठी प्रेम आणि राजा परत येत आहेत ते जुडवा-2 या सिनेमातून. मात्र सिनेमात प्रेम आणि राजा बनणार सलमान खान नसून त्याची जागा घेतली आहे अभिनेता वरुण धवन याने.- नव्या पीढीचा प्रेम आणि राजा बनून जुडवा-2 रसिकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर जारी करण्यात आलं आहे. हा एक बॉलीवुड एक्शनपट असून त्याचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेविड धवन यांनी केलंय. तर सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. सिनेमाच्या या पोस्टरवर वरुणचे दोन अवतार पाहायला मिळत आहेत. एकात वरुण सूटाबुटात चष्मा लावलेल्या अवतारात पाहायला मिळत आहे. तर दुस-यात वाढलेले केस, बिनधास्त डॅशिंग अंदाजात वरुणचा अवतार पाहायला मिळत आहे. या सिनेमात वरुण दोन दोन अभिनेत्रींशी प्रेमाचे धडे गिरवताना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पिंक फेम तापसी पन्नूसह वरुण रोमान्स करताना पाहायला मिळेल.- 29 सप्टेंबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. वरुणचा बद्रीनाथ की दुल्हनियाँ हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात वरुण आणि अभिनेत्री आलिया भट्टची केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून सिनेमाची गाणीसुद्धा रसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. याच पार्श्वभूमीवर वरुणच्या नव्या सिनेमाचं म्हणजेच जुडवा-2चं पोस्टर रिलीज करुन निर्माते साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक डेविड धवन यांनी मौके पे चौका मार लिया असं म्हटल्यास वावगं ठरु नये.- त्यामुळे आता जुडवा सिनेमातील सलमान खानने केलेली धम्माल मस्ती आणि जादू जुडवा-2 सिनेमातही  वरुण ती कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.