सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूणने स्वत: सुजीत सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तो शुजीत यांना भेटायलाही गेला होता. त्यावेळी शुजीत ‘अक्टूबर’ या चित्रपटावर काम करीत होते. जेव्हा वरुणने त्यांना या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी त्याला लगेचच संधी दिली. कारण शुजीतच्या मते, वरूण एक चांगला अभिनेता आहे. तो कोणतीही भूमिका अगदी सहजपणे साकारू शकतो. ‘अक्टूबर’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास शुजीतच्या मते, या चित्रपटाचीदेखील इतर चित्रपटांप्रमाणे वेगळी आणि हटके कथा आहे. आम्हाला या चित्रपटाची आयडिया एका वृत्तापत्रातून मिळाली होती. त्यावेळी आम्ही ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत होतो. हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल, असेही शुजीतने सांगितले.}}}} ">She is the #October girl I was looking for. @ShoojitSircar@ronnielahiri. pic.twitter.com/UGRd55KaEI— Varun PREM Dhawan (@Varun_dvn) September 2, 2017
‘अक्टूबर’साठी वरूण धवनला मिळाली हिरोईन, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 21:41 IST
काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट झाले होते की, वरूण धवन दिग्दर्शक शुजीत सरकार यांच्या आगामी ‘अक्टूबर’ या चित्रपटात प्रमुख भूमिका ...
‘अक्टूबर’साठी वरूण धवनला मिळाली हिरोईन, पहा फोटो!
काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट झाले होते की, वरूण धवन दिग्दर्शक शुजीत सरकार यांच्या आगामी ‘अक्टूबर’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर चित्रपटात वरूणची हिरोईन कोण असेल? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. आता हिरोईनचा शोध संपला असल्याचे वरूणनेच स्वत: ट्विट करून सांगितले आहे. या चित्रपटाची शूटिंग आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. असो, हिरोईनचा शोध संपल्याचे ट्विट करताना वरूणने लिहिले की, ‘ही अक्टूबरची हिरोईन आहे. जिचा मी शोध घेत होतो’ यावेळी वरूणने एक फोटोही शेअर केला आहे. आता जर तुम्ही असा विचार करीत असाल की, वरूण धवन हा मसाला चित्रपट करीत असतो मग त्याच्या हातात शुजीत सरकारचा चित्रपट कसा लागला? तर याचे हे उत्तर आहे की, वरूण धवन स्वत: दिग्दर्शकांकडे या चित्रपटासाठी गेला होता.