Join us  

Exclusive! स्त्री 2 मध्ये काम करण्याविषयी वरुण धवनने केला मोठा खुलासा

By प्राजक्ता चिटणीस | Published: April 05, 2019 4:12 PM

राजकुमार राव याच्या प्रसिद्ध स्त्री या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार असून या चित्रपटात राजकुमार ऐवजी वरुणची वर्णी लागली असल्याची सुरू आहे.

ठळक मुद्देवरुण पुढे म्हणाला, राजकुमार रावने स्त्री या चित्रपटात खूपच चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे सिक्वल येणार असल्याचे मी ऐकले आहे. पण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी मला कोणीही विचारले देखील नाहीये.

कलंक या चित्रपटात वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील वरुणची भूमिका ही आजवरच्या त्याच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन या चित्रपटाची टीम करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वरुणने नुकतीच लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीच्याच दिवशी वरुण धवन विषयी एक बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. राजकुमार राव याच्या प्रसिद्ध स्त्री या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार असून या चित्रपटात राजकुमार ऐवजी वरुणची वर्णी लागली असल्याची चर्चा होती. त्याबाबत वरुणला विचारले असता मी देखील या बातम्या सकाळपासून ऐकत आहे. अशा अफवा कोणी पसरवल्या आहेत हेच मला देखील कळत नाही असे वरुणने सांगितले.

वरुण पुढे म्हणाला, राजकुमार रावने स्त्री या चित्रपटात खूपच चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे सिक्वल येणार असल्याचे मी ऐकले आहे. पण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी मला कोणीही विचारले देखील नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. स्त्री या चित्रपटाची टीमच खूप छान होती. त्यामुळे भविष्यात मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले तर मला नक्कीच आवडेल. 

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली होती. या चित्रपटातील स्त्री आज नही कल आना हा संवाद तर चांगलाच गाजला होता. १२९ कोटींची घसघशीत कमाई करून या चित्रपटाने अनपेक्षित धक्का दिला. चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.

टॅग्स :वरूण धवनकलंकराजकुमार राव