Join us  

वरूण धवन आणि रफ्तार येणार या प्रोजेक्टसाठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:14 PM

वरूण धवन आणि रफ्तार यांनी ऑगस्ट महिन्यात घोषित केलेली ब्रीझर व्हिविड शफल ही स्पर्धा म्हणजे ब्रीझरने हिप-हॉप प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार होता आणि या निमित्ताने त्यांनी लिव्ह लाइफ विथ कलर हे मूल्य तरुणांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट होते

ब्रीझर व्हिविड शफल्स या भारतातील सर्वात मोठ्या हिप-हॉप फेस्टिव्हलच्या विजेत्यांची नावे आज वरूण धवन आणि रफ्तार यांनी घोषित केली. प्रत्येक विभागात १, अशा एकूण ४ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. या वर्षीचे विजेते ठरलेल्या टॉरनॅडो (ब्रेकिंग), पॉपकॉर्न (पॉपिंग), सेम एज क्र्यू (रेप युवर स्टाइल) आणि पोलस्टार (क्र्यू) यांनी हिप-हॉप नृत्य महोत्सवातील सर्वात मोठे रोख पारितोषिक जिंकलेच, त्याचप्रमाणे वरूण धवन व रफ्तार यांच्यासमवेत एक्स्क्लुसिव्ह म्युझिक व्हिडियोमध्ये सहभागी होण्याची संधीसुद्धा प्राप्त होणार आहे.

वरूण धवन आणि रफ्तार यांनी ऑगस्ट महिन्यात घोषित केलेली ब्रीझर व्हिविड शफल ही स्पर्धा म्हणजे ब्रीझरने हिप-हॉप प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार होता आणि या निमित्ताने त्यांनी लिव्ह लाइफ विथ कलर हे मूल्य तरुणांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट होते. थिरकत्या माहोलमध्ये या स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत भारतभरातील २००० स्पर्धक सहभागी झाले होते आणि अत्यंत चुरशीची स्पर्धा करत ते अंतिम फेरीत दाखल झाल होते. या अंतिम फेरीच्या कार्यक्रमात रफ्तार, बेनजी, सुमी, लॉइक, देसी हॉपर्स आणि जाना व्हॅन्कोव्हा यांचे दमदार परफॉरमन्स सादर झाले.

''मी गेली दोन वर्ष या प्रवासात सहभागी झालेलो आहे आणि ब्रीझर व्हिविड शफलला अत्युत्तम हिप-हॉप प्लॅटफॉर्म विकसित होताना पाहणे अत्यंत उत्साहवर्धक असते. या वर्षीसुद्धा देशाच्या विविध भागांतून आलेले उत्तम ब्रेकर्स, पॉपर्स आणि क्र्यूज पाहायला मिळाले. त्यांनी एकत्रितपणे हिप-हॉपचा जल्लोष साजरा केला. हा माझ्यासाठी अत्यंत रंजक प्रवास होता आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात काय असेल हे पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे, असे वरूण धवन म्हणाला.

रफ्तार म्हणाला, ''हिप हॉप कम्युनिटीमध्ये अधिकाधिक कलाकार पुढे येत आहेत, त्यांना पाश्चात्य देशांतील हिप हॉप चळवळीने प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून व्यक्त व्हावेसे त्यांना वाटू लागले आहे. ब्रीझर व्हिविड शफल हे व्यासपीठ त्याच विचारधारेशी चपखल मेळ जमवणारे आहे आणि या तरुणा कलाकारांनी सादर केलेली सादरीकरणे लक्षणीय होती. मी विजेत्यांचे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करतो आणि ब्रीझर व्हिविड म्युझिक व्हिडियोमध्ये वरूणसह परफॉर्म करताना त्यांना पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.'' 

टॅग्स :वरूण धवन