Join us  

हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:27 PM

नताशाचा ब्राईडल लूक पाहून नेटक-यांनी दिल्या अशा कमेंट्स

ठळक मुद्देअलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला.

वरूण धवनला अखेर त्याची दुल्हनियां मिळाली. काल वरूण धवनने त्याची बालमैत्रिण नताशा दलालसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. सध्या सोशल मीडियावर या शाही लग्नाचीच चर्चा आहे. इंटरनेटवर वरूण व नताशाच्या लग्नाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.  मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस धवनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अर्थात काही जण वरूण व नताशाच्या लग्नाचे फोटो पाहून काहीसे निराशही आहेत. नव्या नवरीचा लूक आणि तिचा पेहराव अनेकांना आवडला नाही. यावरच्या अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

काहींना मिसेस धवनचा पांढरा लहंगा आवडला नाही. तर काहींना तिने घातलेला पांढरा चुडा खटकला. नवीन नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, हेही अनेकांना खटकले.

लग्नानंतर वरूण व नताशा दोघेही मीडियाला पोज देण्यासाठी रिसॉर्टच्या बाहेर आले. यावेळचा नताशाचा लूक पाहून अनेक युजर्सनी कमेंट्स केल्यात. हे दोघे ‘जस्ट मॅरिड’ तर अजिबात वाटत नाहीयेत. जणू कोणाच्या लग्नात जात आहेत, असे वाटतेय, असे एका युजरने लिहिले.

अनेकांना नताशा नवीन नवरीसारखी दिसत नसल्याचे म्हटले. लग्नासारख्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणासाठी नताशाने निवडलेला ड्रेस आणि तिची ज्वेलरी पाहून अनेकांनी तिच्या बॅड चॉईसवर बोट ठेवले. काही युजर्सनी तर नताशा वरूणपेक्षा मोठी दिसतेय, असे लिहित नताशाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. लग्नात कोणती नवरी पांढरा पोशाख कोण घालते? सिंदूर व लाल चुडा कुठे आहे? असे प्रश्न अनेक युजर्सनी उपस्थित केले.

अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती. रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला पोज दिल्यात. बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या मीडियाला मिठाई, लड्डू वाटण्यात आले.  

पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...!

 

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल