Join us  

वाणी का म्हणाली, एकाचे नाव घेतले तर दुसऱ्यावर अन्याय होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 6:00 AM

लवकरच ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत वार या अ‍ॅक्शन सिनेमात झळकणार आहे.

 

गीतांजली आंब्रे 

वाणी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली आहे. 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातून तिने बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती बेफिक्रे सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसली होती. वाणी लवकरच ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत वार या अॅक्शन सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वाणीशी साधलेला हा संवाद.    वॉर हा एक अ‍ॅक्शनपट आहे सिनेमात तुझी भूमिका काय आहे?या सिनेमाचं शूटिंग करताना खूप मजा आली. सिनेमातील एका गाण्यात मी साया व्हिल केलंय, स्विमिंग पॉल केलंय ते माझ्यासाठी अॅक्शन करण्यापेक्षा काही कमी मी नव्हतं. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. मी भूमिकेबाबत जास्त काही सांगू शकतं नाही पण मी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

तुझ्या फिटनेस ट्रेनिंगचे स्वरुप काय होते ?मी दिवसातील दोन तास जीम करायचे आणि चार ते पाच तास मी साया व्हिल आणि स्विमिंग पॉलची ट्रेनिंग घ्यायचे. त्यामुळे दिवसातून जवळपास सहा तास तरी मी फक्त फिजीकल फिटनेसवर काम करायेच.    

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ पैकी तुला कोणाचा डान्स आवडतो ?ते दोघे ही उत्कृष्ट डान्सर आहेत. दोघांची शैली, पर्सनालिटी आणि स्टाईल वेगळी आहे. मी ऋतिकसोबत काम केले आहे तो अप्रतिम डान्सर आहे. तर टायगरचे सिनेमा मी पाहिले आहेत ज्यात त्याने उत्कृष्ट नृत्य केले आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाचे नाव घेणे हा दुसऱ्यावर अन्याय असेल. मला असं वाटतं दोघेही आपआपल्या शैलीत मास्टर आहेत.

तुझ्या कुटुंबातून कोणी बॉलिवू़डमध्ये नाही आहे, अशा वेळेला मुलींसाठी सिनेमात काम मिळणं किती कठीण असते ?माझ्या नशीबाने मला चांगली लोक भेटली. एन्जसी माझ्यापर्यंत लोक फिल्टर करुन पाठवायची. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा प्रोब्लेम झाला नाही. पण मी समजू शकते जे लोक बी-टाऊनमध्ये काम मिळवण्यासाठी छोट्या-छोट्या शहरातून मुंबईत येतात. त्यांना योग्य माणसं भेटणं फार महत्त्वाचे असते. पण हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियावर असतो. याचा फायदा तुम्हाला - कास्टिंग डिरेक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी होते.  कास्टिंग डिरेक्टर सतत सोशल मीडियावर कामासंदर्भातल्या पोस्ट शेअर करत असतात. त्यामुळे त्यांना कामाबाबत विचारणं सोप जाते.  

 समशेरासुद्धात तू दिसणार आहेस त्याबाबत काय सांगशील ?समशेरा हा एक पीरिएड ड्रामा सिनेमा आहे. मी यात एक वेगळ्या प्रकराची भूमिका साकारते आहे जी मी आतापर्यंत कधीच केलेली नाही. समशेराच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करते आहे. करण  सिनेमात आपल्याला काय काय हवं याबाबत खूप ठाम असतो.

टॅग्स :वाणी कपूरवॉर