उर्वशी रौतेलाचे कारमधील ‘हे’ फोटो बघून चाहत्यांनी गायिले तिचे गोडवे, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 19:44 IST
बॉलिवूडची बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेलाचा ब्लॅक ड्रेसमधील फोटो लोकांचे लक्ष आकर्षित करताना दिसत आहे. उर्वशी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह ...
उर्वशी रौतेलाचे कारमधील ‘हे’ फोटो बघून चाहत्यांनी गायिले तिचे गोडवे, पाहा फोटो!
बॉलिवूडची बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेलाचा ब्लॅक ड्रेसमधील फोटो लोकांचे लक्ष आकर्षित करताना दिसत आहे. उर्वशी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. आता तिने ब्लॅक ड्रेसमधील कारमध्येच पोज देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोवरून तिच्या चाहत्यांकडून उर्वशीचे चांगलेच कौतुक केले जात आहे. उर्वशी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी राइड आॅफ सेफ्टी २०१८ या अभियानाशी जोडलेली आहे. या अभियानाअंतर्गत ती लोकांना सेफ ड्राइव्ह आणि हेल्मेटचा वापर करण्याची विनंती करीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘हेट स्टोरी-४’ नंतर उर्वशी एका कॉमेडी चित्रपटात बघावयास मिळू शकते. हा एक बोल्ड कॉमेडी चित्रपट असणार आहे. वास्तविक अद्यापपर्यंत उर्वशीने याविषयीची कुठेही वाच्यता केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर सध्या तिच्या या चित्रपटावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे नाव ‘भानुप्रिया’ असणार आहे. या चित्रपटात उर्वशी एका लाजाळू मुलीची भूमिका साकारणार आहे. असेही म्हटले जात आहे की, चित्रपटात तिचे नाव व्हर्जिन भानुप्रिया असे असेल. कारण चित्रपटात उर्वशी अशा मुलीची भूमिका साकारत आहे, जिला तिची व्हर्जिनिटी गमवायची आहे. दरम्यान, उर्वशी इंडस्ट्रीत बोल्ड इमेज बनविण्यास यशस्वी झाली आहे. आता पुन्हा एकदा ती या चित्रपटात अशाच अंदाजात बघावयास मिळणार असल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अदा बघावयास मिळू शकतात.