‘बादशाहो’ पीसीचा आगामी चित्रपट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 11:30 IST
‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ सारख्या प्रोजेक्टमध्ये सध्या प्रियंका चोप्रा बिझी आहे. जय गंगाजल पासून ती अत्यंत बिझी आहे. तेव्हापासून नंतर ...
‘बादशाहो’ पीसीचा आगामी चित्रपट ?
‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ सारख्या प्रोजेक्टमध्ये सध्या प्रियंका चोप्रा बिझी आहे. जय गंगाजल पासून ती अत्यंत बिझी आहे. तेव्हापासून नंतर तिने कुठला नवा प्रोजेक्ट हाती घेतलाही नाही. आता असे वाटतेय की, प्रियंका चोप्रा आता आणखी एका नव्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.करिना कपूर खान मिलन लुथरिया यांच्या ‘बादशाहो’ चित्रपटातून बाहेर पडली. ज्यात अजय देवगण आणि विद्युत जामवाल आहेत. आता या प्रोजेक्टसाठी चित्रपटाची टीम प्रियंका चोप्राकडे वळली आहे. तारखांचा मेळ जमवणे सुरू झाले आहे. पीसी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खुप चर्चेत आहे. अजयने स्वत: प्रियंकाचे नाव मिलनला सुचविले आहे.अजय-पीसी यांनी ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यानंतर प्रियंकाला अजयसोबत अनीस बाझमींचा ‘बेनाम’चित्रपट करावयाचा होता. त्याचे केवळ तीन दिवस शुटिंग चालले. नंतर तारखांच्या घोळामुळे चित्रपट रिलीज होण्यास थांबवावे लागले. तेव्हापासून त्यांनी एकत्र काम केलेले नाही. जर पीसीने बादशाहोमध्ये काम केले तर अजय-पीसीची केमिस्ट्री खुप वर्षांनी पहायला मिळेल.