Join us

राम चरणची पत्नी उपासानाने केलं सासूबाईं सोबत ट्विनिंग, गुलाबी 'अनारकली'मध्ये फ्लॉन्ट केलं बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 19:45 IST

उपासना लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

साऊथ अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) लवकरच आई-बाबा होणार आहेत. उपासना लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. उपासना अनेकदा तिच्या इन्स्टा हँडलवर सक्रिय असते.  अलिकडेच तिने हनुमान जन्मोत्सव साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. 

उपासना तिच्या सासरच्यासोबत समारंभात उपस्थित राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. 7 एप्रिल 2023 रोजी, उपासनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिची सासूबाईंसोबतचा एक फोटो पोस्ट केला.

फोटोमध्ये उपासना सुंदर गुलाबी अनारकली सूटमध्ये परिधान केलेले पाहू शकतो. यात ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो दिसतोय. दुसरीकडे तिची सासूबाई गुलाबी रंगाच्या साडीत दिसतायेत.

अलिकडेच दुबईत उपासनाचे बेबी शॉवर मोठ्या थाटात साजरे करण्यात आले. सेलिब्रेशनच्या दरम्यानच्या व्हिडओमध्ये,राम आणि उपासनाने रोमँटिक पोझ देताना दिसले.  १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे. 

टॅग्स :राम चरण तेजा