Join us  

दिल्लीच्या ताहिर राज भसिनचं महाराष्ट्राच्या मातीशी खास नातं, जाणून घ्या कसं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 8:00 AM

ताहिने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली.

ताहिर राज भसिन म्हणजे पडद्यावर हमखास दमदार परफॉर्मन्स देणारा कलाकार अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. . ताहिने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून. या सिनेमात ताहिर राज भसिनने साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. यानंतर ताहिर मंटो आणि फोर्स-2 मध्ये दिसला.ताहिर आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करतो आहे. या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी.

ताहिरच्या वैयक्तिक आयुष्यात बाबत बोलायचे झाले तर त्याचा जन्म दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात झाला आहे. ताहिरचे आजोबा आणि बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात ताहिरचे शिक्षण झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पंजाबी कुटुंबात जन्मालेल्या ताहिरचे मराठीशी एक वेगळं नातं आहे. होय तुम्ही बरोबर वाचलातं. ताहिरच्या आईची काश्मिरी महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे ताहिराला मराठी भाषा बऱ्यापैकी समजते. तसेच त्याची भविष्यात मराठी शिकायची देखील इच्छा आहे.

 सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरे सिनेमात ताहिरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ताहिरने साकारलेली डेरेकची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली आहे.वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, कबीर खान दिग्दर्शित ८३ या बहुप्रतिक्षित सिनेमात हा तरुण अभिनेता सुनील गावसकर यांची भूमिका बजावणार आहे. १९८३ साली 'अंडरडॉग' समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने विश्वकप जिंकून अद्वितीय कामगिरी केली, त्याची ही कथा आहे.या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनामुळे हा सिनेमा अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही. 

टॅग्स :८३ सिनेमा