Join us  

मराठमोळा अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे कमालीची सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 8:00 AM

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे.

ठळक मुद्देशरद एक मोठा डबिंग आर्टिस्ट म्हणूनही ओळखला जातो.

अजय देवगण, सैफ अली खान, काजोल अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.  अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. अलीकडे ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’च्या ट्रेलर लॉन्चवेळी जे काही घडले, त्यामुळे शरद केळकर अचानक चर्चेत आला. या इव्हेंटमध्ये   शरद केळकरला तो साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल   प्रश्न विचारण्यात आलेत. प्रश्न विचारताना एका पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरदने लगेचच शिवाजी नव्हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणा, असे त्या पत्रकाराला बजावले.  शरदच्या मनातील शिवाजी महाराजांबद्दलचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. आज याच मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2005 मध्ये शरदने किर्ती गायकवाडशी लग्न केले. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना किशा नावाची एक मुलगी आहे.

किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे.

अभिनयात येण्यापूर्वी शरद जिममध्ये नोकरी करायचा, हे क्वचितच लोकांना ठाऊक असेल. शरदचे सुरुवातीचे शिक्षण ग्वालियरमध्ये झाले. तर इंदूरच्या प्रेस्टीज कॉलेजमधून त्याने एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. या काळात शरदने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 2002 साली शरद ग्रेसिम मिस्टर इंडियाचा फायनलिस्ट ठरला. पण तो हा किताब जिंकू शकला नाही. मुंबईत आल्यानंतर शरदने एका टेलिकॉम कंपनीत पार्ट टाइम जॉब सुरु केला. सोबतच एका जीममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. कामासोबतच तो मॉडेलिंगसुद्धा करु लागला होता.

 2004 मध्ये शरदला छोट्या पडद्यावर संधी मिळाली.  दूरदर्शनवर प्रसारित होणा-या ‘आक्रोश’या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अनेक हिंदी रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट म्हणूनही तो दिसला. कालांतराने  हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो,  मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा  आदी बॉलिवूडच्या सिनेमात तो झळकला. 

 प्रभासने साकारलेल्या बाहुबली या व्यक्तिरेखेला शरदने आवाज दिला आहे. आज शरद एक मोठा डबिंग आर्टिस्ट म्हणूनही ओळखला जातो.

टॅग्स :शरद केळकर