Join us  

दिशा पटानीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? जाणून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 8:10 PM

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

टायगर श्रॉफची गर्लफ्रेड म्हणून अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते दिशाचा जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा केला असून  29 वर्षांची झाली आहे. 13 जून 1992 रोजी बरेली (यूपी)मध्ये दिशाचा जन्म झाला होता. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात 2015 च्या तेलगू 'लोफर' सिनेमा पासून केली होती. त्यानंतर लगेचच दिशाला महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक 'धोनीः द अनटोल्ड स्टोरी' मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. 

दिशाच्या करिअरची सुरुवातीच्या पाच वर्षात तिने आठ सिनेमात काम केले आहे.  दिशा पाटनीनेही तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिशाही आलिशान आयुष्य जगते. दिशाने मुंबईत वांद्रे परिसरात आलिशान फ्लॅटही तिने खरेदी केला होता. २०१७ मध्ये तिने हा फ्लॅट स्वतःला गिफ्ट केला होता. लिटील हट असे तिच्या घराचे नाव असून ५ करोड इतकी तिच्या फ्लॅटची किंमत असल्याचे सांगितले जाते.दिशा पाटनी आणि तिचे कुटुंब मूळचे उत्तराखंडच्या टनकपूर येथील आहेत.

2015 मध्ये दिशाने कॅडबरी डेअरी मिल्कची जाहिरात केली होती. या जाहीरातीतून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर दिशा अनेक  मोबाईल कंपनीच्या जाहीरातींमध्येही झळकली होती. 2016 मध्ये दिशा पटानीने टायगर श्रॉफसोबत 'बेफिक्रा' म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. दिशाने आतापर्यंत एमएस धोनी, कुंगफू योगा, वेलकम टू न्यूयॉर्क, बाघी 2, भारत, मलंग बागी 3 आणि राधे या सिनेमांमध्ये काम केले आहे.दिशा अलीकडेच ‘राधे’ सिनेमात सलमान खानसोबत झळकली होती. याशिवाय, ती आशिमा छिब्बरचा सिनेमा केटीनामध्येही दिसणार आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे, यामुळे तिचे फॉलोअर्सच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असते. आज जगभरात तिचेही चाहते आहेत.नेहमी आपल्या स्टाईल आणि बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. 

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफ