आगळावेगळा रोल माझा - रिचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:53 IST
'सरबजीत' या आगामी बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चढ्ढा अगदीच वेगळी भूमिका करणार आहे. 'मेरी कॉम' नंतर ओमंग कुमार या बायोपिकमध्ये ...
आगळावेगळा रोल माझा - रिचा
'सरबजीत' या आगामी बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चढ्ढा अगदीच वेगळी भूमिका करणार आहे. 'मेरी कॉम' नंतर ओमंग कुमार या बायोपिकमध्ये काम करणार आहे. या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिका साकारणार असून त्याची पत्नी सुखरप्रीत कौर ची भूमिका करणार आहे. ती म्हणते,' मी नेहमी काहीतरी वेगळे करू पाहते आणि आत्तापर्यंतचा हा माझा अत्यंत वेगळा, हटके रोल आहे. खरंतर हा रोल खुपच आव्हानात्मक आहे. हा रोल माझ्यासाठी खुप आव्हाने घेऊन आला आहे. सध्या सर्वजण क्रिसमस आणि न्यू ईअरमुळे आपापल्या कुटुंबियांसोबत असल्यामुळे आता जानेवारीत पुन्हा त्याची शूटिंग सुरू होईल.