हृतिक रोशन बॉलिवूडमधील सर्वांत चांगल्या डान्सरमध्ये सामील आहे. त्याच्या चित्रपटात एकतरी गाण्यात त्याचा डान्स त्याच्या चाहत्यांना पहायला मिळतोच. हृतिक रोशन व यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'काबिल' या चित्रपटाचे 'मोन अमोर' हे डान्स थिम साँग रिलीज करण्यात आले आहे. हृतिक व यामीची या गाण्यातील डान्स केमिस्ट्री लाजवाब आहे.
'काबिल' या चित्रपटातील हृतिक रोशन व यामी गौतम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले रोमाँटिक डान्स सॉग ‘मोन अमोर’रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे कानावर पडताच हे गाणे तुमच्या मनात आपली जागा निर्माण करते आणि डान्स करण्याची प्रेरणा देते, ‘मोन अमोर’ हा फ्रेंच शब्द असून, त्याचा अर्थ ‘माझा प्रिय’ असा आहे.
'काबिल' या चित्रपटात हृतिक रोशन व यामी गौतम यांनी अंधाच्या भूमिका केल्या असल्या तरी देखील दोघांचे डान्स स्टेप्स व केमिस्ट्री अतिशय सुंदर आहे. दोन अंध व्यक्ती किती चांगला डान्स करू शकतात हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनयाच्या दृष्टीने पाहिले तर हे गाणे करताना यामी व हृतिकला चांगलीच मेहनत घ्यावी लागली असेल असे दिसते. गाणे पाहताना दोघांची मेहनत जाणविते. स्पर्श व कदमताल याचा अनोखा मेळ घालण्यात यामी व हृतिक यशस्वी ठरले आहे असे म्हणता येईल.
'मोन अमोर'' या गाण्याला विशाल दादलानी याने गायले असून, राजेश रोशनने संगीतबद्ध केले आहे. राजेश रोशन मोजक्याच चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करतात मात्र, आजच्या युगातील संगीताची त्यांचा चांगलीच जाण आहे असे काबिलचे गाणी पाहून वाटते. ‘काबिल’ची दोन गाणी रिलीज करण्यात आली असून, उर्वशी रौतेलाचे ‘सारा जमाना’ हे आयटम साँग चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. यानंतर आता हृतिक पुन्हा एकदा धमाल करण्यास तयार असल्याचे दिसते.
youtubelink:https://www.youtube.com/watch?v=w9PdxY17uUg