Join us  

तर सुशांत वाचला असता, बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्या 'त्या' वक्तव्यावर उठवला सवाल, दिली संतप्त प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:04 PM

तो नैराश्यात होता हे कळाल्यानंतर  सुशांतला त्यातून मुकेश भट्ट यांनी बाहेर निघण्यास मदत केली नाही हे अत्यंत लाजिरवाणं होतं असे मत बाबुल सुप्रियो यांनी व्यक्त केेल आहे.

वयाच्या 34 व्या वर्षीच जगाचा असा अचानक निरोप घेणाऱ्या सुशांत जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडला धक्का बसाल आहे. सुशांतला श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर पर्यंत सर्वांनीच ट्वीट केले. त्यानंतर आता निर्माता मुकेश भट यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल नवा खुलसा केला आहे. सुशांत असं काही तरी करेल याची मला आधीच चाहुल लागली होती असं त्यांनी म्हटलं आहे.  सुशांत हा  नैराश्याचा बळी पडला आहे हे माहिती असूनही त्यांनी यावर काहीच केले नाही. मुकेश भट्ट यांच्या या स्टेटमेंटनंतर सिंगर आणि राजकीय नेता बाबुल सुप्रियो यांनी हे सर्व धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. 

जेव्हा महेश भट्ट यांना  हे जाणवत होतं त्यावेळी ते पुढे का नाही आले. यावर त्यांनी काही करणे गरजेचे होते. सुशांतह मनमोकळेपणाने बोलण्याची गरज होती. तो नैराश्यात होता हे कळाल्यानंतर  सुशांतला त्यातून मुकेश भट्ट यांनी बाहेर निघण्यास मदत केली नाही हे अत्यंत लाजिरवाणं होतं.'

सुशांत सिंह मूळ बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील होता. 90 च्या दशकात त्यांचे संपूर्ण कुटुंब पाटण्यात स्थायिक झाले होते. सुशांतचे वडील केके सिंह सरकारी अधिकारी होते. सुशांतचे प्राथमिक शिक्षण पटनाच्या सेंट कैरेंस स्कूलमधून झाले. त्यानंतर तो दिल्लीला गेला.  मोठा स्टार बनल्यानंतरही त्याच्या स्वभावात काहीच बदल झाला नव्हता.

टॅग्स :बाबुल सुप्रियोसुशांत सिंग रजपूत