स्टंट सीन करताना दोन कन्नड अभिनेत्यांचा दुर्दैवी अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 13:23 IST
बेंगळुुरूनजिक ‘मास्ती गुडी’ या कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन कन्नड अभिनेत्यांचा मृत्यू झाला आहे. तथापि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते ...
स्टंट सीन करताना दोन कन्नड अभिनेत्यांचा दुर्दैवी अंत!
बेंगळुुरूनजिक ‘मास्ती गुडी’ या कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन कन्नड अभिनेत्यांचा मृत्यू झाला आहे. तथापि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते दुनिया विजय यांना वाचवण्यात यश आले आहे. ‘मास्ती गुडी’ या कन्नड चित्रपटात उदय आणि अनिल हे काम करत आहेत. चित्रपटातील एका स्टंट सीनदरम्यान उदय आणि अनिल यांना टीप्पागोंदनाहल्ली जलाशयात उडी मारायची होती. हेलिकॉप्टरमधून या या दोघांनी पाण्यात उडी मारली. पण बराच वेळ होऊनही ते पाण्याबाहेर न आल्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. दरम्यान, या दोघांसह चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता दुनिया विजय यानेही पाण्यात उडली मारली होती. पण, पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला. प्राप्त माहितीनुसार, उदय आणि अनिल यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर एक बोट त्यांना पाण्यातून बाहेर काढणार होती. पण, या बोटीस पोहचण्यास उशीर झाल्याने ही दुदैर्वी घटना घडल्याचे मानले जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुनिया विजयने सेफ्टी जॅकेट घातले होते. पण, उदय आणि अनिल यांना असे कोणतेच जॅकेट देण्यात आले नव्हते. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. - तरिही केला स्टंटउदय व अनिल हे दोघेही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील युवा अभिनेते आहेत. काही चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसले. हा स्टंट सीन करण्यापूर्वी अनिल कमालीचा नर्व्हस होता. हा सीन करण्यापूर्वी त्याने एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मला पोहता येत नाही. पण माझ्या भूमिकेत जीव ओतण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी यापूर्वी कधीही असा स्टंट केलेला नाही. आता सगळे काही परमेश्वराच्या भरवशावर आहे, असे तो म्हणाला होता. उदय व अनिल दोघांनाही पोहता येत नव्हते. याऊपरही त्यांना हा स्टंट करण्यास सांगण्यात आले.