Join us  

उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये! आधी केले ‘सुसाईड’चे ट्विट नंतर केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 3:45 PM

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट केले आणि बॉलिवूडमध्ये जणू ‘भूकंप’ आला.

ठळक मुद्देयश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे.

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट केले आणि बॉलिवूडमध्ये जणू ‘भूकंप’ आला. होय, या ट्विटमध्ये उदयने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला. ‘मी माझे ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी डि-अ‍ॅक्टिवेट केलेय. असे वाटले मी मरणार आहे. हे अभूतपूर्व होते. माझ्यामते, आत्महत्या एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच हा पर्याय स्थायीरूपात स्वीकारू शकतो,’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. ‘मी ठीक नाही, हे मी कबुल करतो. आत्तापर्यंत मी प्रयत्न करतोय पण अपयशी ठरतोय,’असेही त्याने म्हटले होते.

उदयच्या या ट्विटनंतर चाहते घाबरले. बॉलिवूडमध्येही खळबळ माजली. अर्थात काही तासानंतर हे दोन्ही ट्विटउदयने डिलीट करत तो सहीसलामत असल्याचा खुलासा केला. ‘माझ्या ताज्या टिष्ट्वटमुळे काही लोक चिंतीत झाले. मी अगदी ठणठणीत आहे. मी अशा काही गोष्टींशी लढतोय, जे मी स्वत:ही समजू शकत नाही. पण मी ठीक आहे. तुमच्या प्रेमासाठी आभार,’असे त्याने म्हटले.

उदयच्या या ट्विटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे तो डिप्रेशनमध्ये आहे. तूर्तास तरी या डिप्रेशनमधून तो लवकरात लवकर बाहेर पडो, या शुभेच्छा देऊया.यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याने २००० सालच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘धूम’च्या सीक्वलमध्ये तो दिसला़ २०१२मध्ये उदयने ‘योमिक्स’ नावाची स्वत:ची कंपनी स्थाापन केली. ही कंपनी यशराज बॅनरच्या सुपरहिट चित्रपटांवर आधारित कॉमिक्स तयार करते.

टॅग्स :उदय चोप्रा