Join us  

‘ग्लॅमरसोबतच गिरवतोय अभिनयाचेही धडे!’-अभिनेता आयुष शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 4:22 PM

‘लव्हयात्री’ हा चित्रपट वेगवेगळया कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेता आयुष शर्मा हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिचा पती असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने आता अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली आहे.

तेहसीन खान

‘लव्हयात्री’ हा चित्रपट वेगवेगळया कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेता आयुष शर्मा हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिचा पती असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने आता अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली आहे. स्टारडमसोबत अनेक गोष्टी शिकायच्या आहेत, असे त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले.

* आतापर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगशील?- बराच मोठा प्रवास आहे. आम्ही लहान असताना खूपच वेगळया प्रकारचे आयुष्य जगलो आहोत. मतदान केव्हा होणार आहे? कोणता मंत्री निवडून येणार? यातच आमचं आयुष्य होतं. पण, सरळ ग्लॅमरच्या विश्वात येऊन आम्ही अ‍ॅक्टिंग करू ही गोष्ट आमच्या मनीध्यानीही नव्हती. आम्ही कुठल्या तरी खास दिवशी सगळे मिळून चित्रपट बघायला जात असू. मी आमच्या पिढीचा पहिला मुलगा असेल की जो चित्रपटात हिरो बनला आहे. मी हिमाचलमधील पहिला हिरो आहे. अनुपम खेर आहेत पण मुख्य भूमिका करणारा मीच पहिला अभिनेता आहे. आता लोकांच्याही अपेक्षा खूप वाढल्या असून मलाही प्रचंड उत्सुकता आहे.

* अलिकडेच एका तरूणीने तुला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. चित्रपट रिलीजपूर्वीच तुला फॅन्सचे एवढे प्रेम मिळते आहे. अर्पिताची यावर काय प्रतिक्रिया आहे?- मला प्रेक्षकांचा असा प्रतिसाद मिळतोय, हे पाहून मी स्वत:ला खूपच ग्रेटफुल मानतो. ट्रेलर रिलीज होण्यानंतर मी जेव्हा शहरातील टूरला निघालो तेव्हा मला ४० कॉलेजेसचे विद्यार्थी भेटायला आले. मी सध्या खूप खूश आहे. माझी पत्नी अर्पिता आणि सलमान खान यांचा मी आभारी आहे. लोकांना आता माझ्याबद्दल उत्सुकता आहे. यात माझी पत्नी अर्पिताचा खूप पाठिंबा आहे. कारण ती मला या क्षेत्रातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायला सांगते. मी तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. तिने तिचा भाऊ सलमानला लहानपणापासून असंच स्टारडम एन्जॉय करताना पाहिलं आहे. त्यामुळे तिच्यासाठी या गोष्टी नव्या नाहीत. 

* तू लग्नानंतर आणि मुलगा असताना बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहेस. ही गोष्ट तुझ्या करिअरला बाधा ठरेल, असे वाटत नाही का?- माझ्या करिअरला कुठलीही दिशा नव्हती. मी राजकारण या क्षेत्रातून आलो आहे. पण, मी कधीही राजकारण केले नाही. मी मुंबईत येऊ इच्छित होतो आणि एक रेस्तराँ सुरू करायचं होतं. अशातच लोक मला अभिनेता बनण्याचे सल्ले देत होते. अर्पिता तेव्हा माझी मैत्रीण होती. तिने देखील मला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी बजरंगी भाईजानसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. आणि लग्न-मुलं असण्याबद्दल मी म्हणेन की, शाहरूख खानचे देखील लग्न झाले आहे. त्यालाही मुलं आहेत. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी तितकी महत्त्वाची नाही.

* सलमान खानच्या कुटुंबासोबत तुझे जवळचे संबंध असल्याने तुला लोक लवकर स्विकारतील? ‘लव्हयात्री’बाबतचा अनुभव कसा होता?- होय. मला कायम लोकांनी पाठिंबा दिला. सगळयांना वाटतं की, मी इंडस्ट्रीत नवा आहे. मी कोणत्याही नव्या कलाकाराप्रमाणे एकदम साधा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं लग्न सलमानची बहीण अर्पितासोबत झाल्याने लोकांना असे वाटेल की, मी खान कुटुंबियांने पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे केवळ मला एक संधी मिळालीय. त्याचा आदर करून मी पुढचा प्रवास करणार आहे.

 * ‘लव्हयात्री’साठीचे ट्रेनिंग कसे होते? तू ६ महिने यासाठी गरबा शिकला आहेस?- होय, मी आत्तापर्यंत कधीही गरबा केला नव्हता. जेव्हा मी सराव करायला सुरूवात केली तेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना धक्का मारायचो किंवा त्यांनाही खेळता खेळता पाडायचो. सुरूवातीला मला खूपच कठीण वाटायचं. मात्र, हळूहळू करता येऊ लागलं आणि मग मलाही मजा येऊ लागली. मला अशाप्रकारे गरबा करायचा होता की, चित्रपट बघून जाणाऱ्या  गुजराती लोकांनी माझ्या मेहनतीचे कौतुक केले पाहिजे. माझ्या गरब्यामुळे त्यांची नाराजी व्हायला नको, हा खरंतर माझा प्रयत्न होता.

टॅग्स :आयुष शर्मालवरात्रिवरिना हुसैन