Join us  

 करिना-सैफला मुलगा होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, वाचून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 1:35 PM

सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन? यावरही जोरदार चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देकरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे.

सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दरम्यान दुस-या बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर काय तर, सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन? यावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवाय मजेदार मीम्सचाही पूर आला आहे.तैमूरला लहान भाऊ झाल्याची बातमी कळताच, सोशल मीडियावर अनेक युजर्सनी एक ना अनेक मीम्स शेअर केलेत. दुसरा भाऊ जन्मास येताच, तैमूरची लोकप्रियता संकटात असल्याचे युजर्सने मत आहे. सैफच्या मोठ्या मुलाचे नाव (पहिली पत्नी अमृतापासून झालेल्या) इब्राहिम आहे. दुस-या मुलाचे नाव तैमूर आहे. आता तिस-या मुलाचे नाव काय असेन? यावरही युजर्स चर्चा करत आहेत. काहींच्या मते, आता सैफिना आपल्या तिस-या मुलाचे नाव बाबर ठेवेन. काहींच्या मते, औरंगजेब ठेवेन. यावरचेही अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

2016 मध्ये करिना व  सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता. तैमूर या नावावरून तेव्हा मोठा वादही निर्माण झाला होता. दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ नव्या अलिशान घरात शिफ्ट झाले आहेत. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जंगी स्वागत होणार आहे.  करिनाच्या डिलिव्हरी अगोदर सैफ अली खान आपले काम पूर्ण करून घेत आहे.

2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. दुस-या प्रेग्नंसीदरम्यानही करिना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत काम करत होती.    करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे तिच्या वाट्याचे शूटींग बेबोने कधीच पूर्ण केले आहे. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर