Join us  

आशा भोसलेंनी आरडी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला दिला होता नकार, तरीही दुसऱ्यांदा थाटला त्यांच्यासोबत संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 1:10 PM

रेकॉर्डींग दरम्यान आशा भोसले यांची ओळख आरडी बर्मन यांच्याशी झाली. आरडी बर्मन यांचेही त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर आरडी बर्मन आशा भोसले यांच्या प्रेमात पडले.

एकाहून एक हिट गीतांचा नजराणा देणाऱ्या आशा भोसले यांची गाणी रसिकांना आजही बेधुंद करतात. आशा भोसले यांचा आवाज जितका गोड होता तितकंच त्यांचं मनंही. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही आशा भोसले चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वैवाहिक आयुष्यही चर्चेचा विषय बनतो. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच आशा भोसले यांनी १६ वर्षांनी मोठे असलेले  गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केलं होतं. 

गणपतराव भोसले हे लता दीदी यांचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते. गणपतराव आणि आशा भोसले यांच्या लग्नामुळे लता दीदी प्रचंड नाराज झाल्या होत्या. आशा भोसले यांच्याही बोलणंही त्यांनी बंद केले होते. आशा भोसले आणि गपणतराव यांचा संसार फार काही टिकला नाही. जवळपास ११ वर्ष संसार केल्यानंतर दोघांनीही घटस्फोट घेत वेगळे झाले. आशा भोसले यांना तीन मुलं होती. आशा भोसले यांनी एकटीनेच मुलांचा सांभाळ केला. त्यांचे करिअरही यशस्वीरित्या सुरु होते.

रेकॉर्डींग दरम्यान आशा भोसले यांची ओळख आरडी बर्मन यांच्याशी झाली. आरडी बर्मन यांचेही त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर आरडी बर्मन आशा भोसले यांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्नासाठी आशा भोसले यांना प्रपोजही केले होते.

आशा भोसले आरडी बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. प्रेमाला वय नसते म्हणतात असेच काहीसे दोघांमध्ये घडले. पहिल्यांदा आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांचे प्रपोजल नाकारले होते. आरडी बर्मन यांनीही हार न मानता त्यांचा होकार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. अखेर आशा भोसलेंनी आरडी बर्मन यांना होकार दिला. लग्नाच्या वेळी आशा भोसले ४७ वर्षांच्या होत्या तर आरडी बर्मन ४१ वर्षांचे होते.

दुसऱ्या लग्नावेळी आरडी बर्मन यांची आई मीरा यांना हे लग्न मान्य नव्हते. त्याचवेळी आरडी बर्मन यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या जाण्याने त्यांना मोठा धक्काच बसला होता. याचदरम्यान त्यांच्या आईचीही तब्येत बिघडली होती. त्यांची स्मरणशक्ती गेली होती. स्वतःच्या मुलालाही त्या ओळखू शकत नव्हत्या. आईच्या तब्येतीत सुधारणा होताच दोघांनी लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. मात्र लग्नाच्या 14 वर्षानंतर आरडी बर्मन यांचे निधन झाले होते. 

 

टॅग्स :आशा भोसलेआर डी बर्मन