Join us  

तुझ्या बायकोला समजाव, नाहीतर...; ट्विंकलची पोस्ट वाचून भडकलेल्या युजरने अक्षयला सुनावलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 6:25 PM

Twinkle Khanna : होय, ट्विंकलनं एक पोस्ट केली आणि ती युजर्सच्या निशाण्यावर आली. फक्त तिचं नाही तर तिच्यामुळे अक्षय कुमारही ट्रोल झाला.

विवेक अग्नीहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची खिल्ली उडवणं ट्विंकल खन्नाला (Twinkle Khanna) चांगलंच महागात पडलं. होय, ट्विंकलनं एक पोस्ट केली आणि ती युजर्सच्या निशाण्यावर आली. फक्त तिचं नाही तर तिच्यामुळे अक्षय कुमारही ( Akshay Kumar) ट्रोल झाला. एका युजरने तर चक्क अक्षयला ‘तुझ्या मूर्ख बायकोला सांभाळ’ असा सल्लाच दिला.आता हे काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊ. तर ट्विंकल खन्नानेद काश्मीर फाइल्स या चित्रपटाची खिल्ली उडवली आणि सोशल मीडिया युजर्स यामुळे संतापले.

 ट्विंकल काय म्हणाली?

सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींची बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे.  अशा चित्रपटाची नावं रजिस्टर करण्यासाठी निर्मात्यांची धावपळ सुरु आहे. मी सुद्धा आता ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे, असा ‘द काश्मीर फाइल्स’ची खिल्ली उडवणारा लेख ट्विंकलने अलीकडे एका दैनिकात लिहिला. तो पाहून लोक संतापले. यानंतरही ती थांबली नाही. तिने पुन्हा या चित्रपटाची खिल्ली उडवणारी पोस्टही शेअर केली.  

 नेटकरी म्हणाले, तुझ्या बायकोला सांभाळ

ट्विंकलच्या या पोस्टवर निर्माते अशोक पंडित यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. ‘मॅम,तुम्ही खूप लेट झालात. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर बनलेल्या या चित्रपटाने आधीच किमया साधलीये. तुम्हाला विनंती आहे की, 7 लाख काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर इतकं असंवेदनशील बनू नका.’अशी पोस्ट अशोक पंडित यांनी केली. अशोक पंडित यांचं हे ट्वीट रिट्वीट करत एका युजरने यावरून अक्षयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘अक्षय कुमारजी, कृपया तुमच्या मूर्ख पत्नीला समजवा नाहीतर एक दिवस तिच्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल. स्वत: फ्लॉप आहेच. आयुष्यात तिला काम मिळालं नाही. आता घरी बसून असा मूर्खपणा जगाला दाखवून तुम्हाला सुद्धा रस्त्यावर आणेल. हिला समजवा..., ’ अशी प्रतिक्रिया या युजरने दिली.   

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारद काश्मीर फाइल्स