शिरीष कुंदर-अनुपम खेर यांचे टिवटयुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:06 IST
आमिर खानने एका मुलाखती दरम्यान केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून बॉलिवूडमध्ये रणकंदन माजले आहे. सोशल मीडियाचा वापर युद्धभूमी म्हणून करण्यात येत ...
शिरीष कुंदर-अनुपम खेर यांचे टिवटयुद्ध
आमिर खानने एका मुलाखती दरम्यान केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून बॉलिवूडमध्ये रणकंदन माजले आहे. सोशल मीडियाचा वापर युद्धभूमी म्हणून करण्यात येत आहे. विशेषत: ट्विटरवरून तर एकमेकांवर हल्ला करण्याची संधी कुणीच सोडलेली नाही. अभिनेता अनुपम खेर हे या युद्धाचे सेनानायकच झाले होते. त्यांनी आमिर खानला टार्गेट केले.दुसरीकडे ट्विटरवर सक्रिय असलेला फराह खानचा नवरा व चित्रपट निर्माता शिरीष कुंदुर यांने आमिर खानची बाजू उचलून धरली. काही वेळातच दोघांत टिव-टिवाटाची मालिकाच सुरू झाली. शिरीषने केलेले ट्विट मजेदारच होते. ''अमीर खान किरण राव बद्दल बोलला किरण खेरबद्दल नव्हे, आशा आहे तुला असलेली अडचण स्पष्ट झाली असेल. जय हो.'' यावर अनुपम खेर म्हणाला ''ओएमजी, मला कधीच वाटल नव्हते तू इतका बुद्धिमान आहेस.''