Join us  

सुशांतचा मित्र संदीप सिंगवर भडकला हा टीव्ही अ‍ॅक्टर; म्हणाला, तुझे रक्त कसे खवळत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:03 PM

सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती आणि मित्र संदीप सिंग यांच्यावर त्याने निशाणा साधला.

ठळक मुद्दे शेखर सुमन, कंगना राणौत, रूपा गांगुली, रतन राजपूत यांच्यानंतर आता टीव्ही अभिनेता तरूण खन्ना यानेही सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला आता महिना पूर्ण होईल. या महिनाभरात पोलिसांनी 30 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली. पण सुशांतने मृत्यूचा मार्ग का पत्करला, या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. त्याचमुळे सुशांतचे चाहते आणि काही बॉलिवूड व टीव्ही स्टार्स आता या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. शेखर सुमन, कंगना राणौत, रूपा गांगुली, रतन राजपूत यांच्यानंतर आता टीव्ही अभिनेता तरूण खन्ना यानेही सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तरूणने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत, सुशांतच्या अतिशय जवळ असलेल्या काही मित्रांवरही संताप व्यक्त केला. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती आणि मित्र संदीप सिंग यांच्यावर त्याने निशाणा साधला.

काय म्हणाला तरूण खन्नाया व्हिडीओत तो म्हणतो, माझे नाव तरूण खन्ना. टेलिव्हिजनचा मी एक लहानसा अ‍ॅक्टर आहे. अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतोय. आज मी सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलणार आहे. मी आजपर्यंत बोललो नाही. पण आता मी बोलणार आहे. सुशांतने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचे म्हटले जातेय. पण त्याच्यासारखा यशस्वी अभिनेता डिप्रेशनमध्ये का असेल? तो आमच्यासाठी हिरो होता. त्याने स्वत:ला संपवले की त्याला मारले गेले, हे जाणून घेण्याचा हक्क आम्हाला आहेच.

मी सुशांतला दोन तीनदा भेटलो होतो. मी त्याला जवळून ओळखत नव्हतो. पण त्याचा मित्र संदीप सिंग तो तर त्याला ओळखत होता ना?  त्याने स्वत:च लोकांना क्लिनचीट कशी काय दिली? संदीप सिंगची एक मुलाखत बघितली. या मुलाखतीत त्याचे पहिलेच वाक्य बघा. सुशांतची हत्या झााली असे कोण म्हणते? तुम्ही लोक काहीही बोलता, हे त्याचे पहिले वाक्य आहे. त्याने सर्वांना अचानक क्लिनचीट दिली. सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पुढे येऊन बोलू शकत नाहीत?  पोलिसांनी बोलायला मनाई केली असल्यास तसे सांगा. आम्ही शांत बसू. जेव्हा तुम्ही त्याच्या घरात राहता, त्याच्या पैशावर जगता. तेव्हा तुम्हाला सगळे कळत होते. आज तोच जगातून निघून गेला आहे. जणू संदीप सिंगनेच सुशांतला घडवले, अशा तो-यात तो मुलाखतीत तो बोलतोय. अरे भावा, तू कोण आहेस? सुशांतसारखा मित्र गमावल्यावर तुझे रक्त खवळत नाही?

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत