Join us  

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'मध्ये दिसली तृप्ती डिमरीची झलक, नेटकरी म्हणाले - "माफ करा पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 9:58 AM

Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया २' या शेवटच्या चित्रपटापासून तिसऱ्या सीक्वलची बरीच चर्चा होत आहे. नुकतीच जेव्हा त्यांची स्टारकास्ट समोर आली तेव्हा या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिका अवतारात दिसणार असल्याचे समोर आले. आता लेटेस्ट वृत्तांमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.

'भूल भुलैया २' या शेवटच्या चित्रपटापासून तिसऱ्या सीक्वलची बरीच चर्चा होत आहे. नुकतीच जेव्हा त्यांची स्टारकास्ट समोर आली तेव्हा या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिका अवतारात दिसणार असल्याचे समोर आले. आता लेटेस्ट वृत्तांमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लचा फोटो दाखवून कोडं सोडवणारी पोस्ट शेअर केलीय आणि चाहत्यांना सांगितले की त्याच्या चित्रपटात येणारी ही मिस्ट्री गर्ल कोण आहे. मात्र, अवघ्या अर्ध्या नजरेत ती दुसरी कोणी नसून तृप्ती डिमरी असल्याचे लोकांच्या लक्षात आले.

कार्तिक आर्यनने या मिस्ट्री गर्लबद्दल ३ पोस्ट केल्या आहेत. पहिल्या झलकमध्ये, तिचे हात आणि तिचा अर्धा चेहरा दिसत होता, दुसऱ्या पोस्टमध्ये तिच्या डोळ्याचा भाग दिसत होता. तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने संपूर्ण पोस्टर शेअर केले आहे. मात्र, पहिल्याच नजरेत ती तृप्ती असल्याचे लोकांना समजले. त्या पोस्टवर अनेकांनी कियाराच्या जागी तृप्तीला घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

काही युजर म्हणाले की, कियाराचं बेस्ट होतीकाही लोकांनी तर म्हटले की, सॉरी, कियारा नाही तर मी आता चित्रपट पाहणार नाही. एक म्हणाला- श्रद्धा कपूरलाही घेतले असते तर बरे झाले असते. दुसरा म्हणाला- माफ करा, पण कियारा नसल्यामुळे भूल भुलैया फ्रँचायझी आता तशी होऊ शकणार नाही. या मालिकेसाठी कियारा सर्वोत्कृष्ट असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.

टॅग्स :तृप्ती डिमरीकार्तिक आर्यन