Trailer Out : श्रीदेवीच्या ‘मॉम’चे ट्रेलर रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 21:27 IST
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्या आगामी ‘मॉम’ या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. ज्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी प्रचंड आतुरता निर्माण झाली होती.
Trailer Out : श्रीदेवीच्या ‘मॉम’चे ट्रेलर रिलीज!
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्या आगामी ‘मॉम’ या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. ज्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी प्रचंड आतुरता निर्माण झाली होती. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, यामध्ये सर्वच कलाकारांच्या भूमिका दमदार असल्याचे दिसून येते. चित्रपटात श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अक्षय खन्ना हे दमदार भूमिकेत बघावयास मिळत असून, त्यांचा अभिनय खूपच कौतुकास्पद ठरेल, अशीच काहीशी झलक ट्रेलरमध्ये बघावयास मिळाली आहे. वास्तविक जेव्हा चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते, तेव्हा कोणावर विश्वास ठेवायचा अन् कोणावर नाही? असा प्रश्न पडला होता. हाच सिलसिला ट्रेलरमध्येही बघावयास मिळत असून, ट्रेलर विचार करण्यास भाग पाडणारा आहे. ट्रेलरची सुरुवातच श्रीदेवीच्या डायलॉगने होते. श्रीदेवी म्हणतेय की, ‘चुकीचे आणि खूपच चुकीचे यापैकी जर तुम्हाला एकाची निवड करायची असेल तर तुम्ही कोणाची निवड करणार?’ यानंतर चित्रपटाच्या कथेचा उलगडा होत जातो. तुम्ही जसजसा ट्रेलर बघता तसे तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य? तसेच काय चुकीचे अन् किती चुकीचे? असे प्रश्न पडत जातात. त्यामुळे हे ट्रेलर यावर्षीच्या चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये सर्वोत्तम असल्याचे बोलले जात आहे. ट्रेलरमध्ये श्रीदेवी आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार भूमिका बघावयास मिळत आहेत. तर नवाजुद्दीन सिद्दिकीचा लुक खूपच हटके दिसत आहे. या भूमिकेसाठी त्याने एक वेगळाच अवतार धारण केला असून, चित्रपटात त्याची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण असावी, हे स्पष्टपणे जाणवते. कारण ट्रेलरच्या पहिल्या भागात श्रीदेवीचा तर दुसºया भागात नवाजुद्दीनचाच जलवा बघावयास मिळतो. आता या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा असून, बॉक्स आॅफिसवर काय करिष्मा दाखविणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच श्रीदेवीच्या परिवाराने एकच जल्लोष केला. यासाठी संपूर्ण परिवार ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. यावेळी नवाजुद्दीनही, अक्षय खन्ना, अमृता पुरी हेही उपस्थित होते. यावेळी श्रीदेवीने पती बोनी कपूरसोबत माध्यमांशी चर्चाही केली. यावेळी श्रीदेवीच्या मुली खुशी आणि जान्हवी यांनीही माध्यमांना पोज दिल्या.