Join us

​- तोपर्यंत प्रियांका चोप्रा आपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 15:40 IST

प्रियांका चोप्रा आज रात्री मुंबईत पोहोचते आहे. अर्थात पुढच्या हॉलिवूड प्रोजेक्टवर काम सुरु करत नाही तोपर्यंत. ‘क्वांटिको’चे दोन सीझन ...

प्रियांका चोप्रा आज रात्री मुंबईत पोहोचते आहे. अर्थात पुढच्या हॉलिवूड प्रोजेक्टवर काम सुरु करत नाही तोपर्यंत. ‘क्वांटिको’चे दोन सीझन आणि  ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट यानंतर प्रियांका जरा निवांत झाली आहे. अर्थात  ‘बेवॉच’नंतर तिने आणखी दोन हॉलिवूड सिनेमे साईन केल्याचे मानले जात आहे. पण प्रियांकाने अद्याप याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे हॉलिवूड प्रोजेक्टवर प्रियांका काम सुरु करत नाही, तोपर्यंत प्रियांका आपली! होय, किमान चार दिवस ती आपल्यासोबत भारतात असणार आहे. चार दिवसांच्या ब्रेकवर प्रियांका आज रात्री मुंबईत दाखल होणार आहे.या चार दिवसांत प्रियांका काही बॉलिवूड प्रोजेक्टवरची चर्चा पूर्ण करून ते मार्गी लावण्याच्या विचारात आहे. होय, म्हणजेच बॉलिवूडपट साईन करण्याच्या तयारीत आहे. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’नंतर प्रियांकाने एकही चित्रपट केलेला नाही. पण आता कदाचित भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका दिसू शकते. सूत्रांचे खरे मानाल तर प्रियांका भन्साळींचा ‘गुस्ताखियां’ साईन करू शकते. हा चित्रपट म्हणजे, सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांचे बायोपिक आहे. प्रियांका या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक असल्याचे कळतेय. मी भन्साळींना कधीच नाही म्हणू शकत नाही, असे प्रियांका एकदा म्हणाली होती. पण या चित्रपटाचा हिरो फायनल झाल्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणार आहे. सध्या या चित्रपटासाठी शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन यांच्या नावांची चर्चा आहे. यातील हिरो कवी साहिर लुधियानवी यांची भूमिका साकारताना दिसेल. एकेकाळी साहिर आणि अमृता यांच्यातील मधूर संबंधांची बरीच चर्चा  होती.ALSO READ :  प्रियंका चोपडा पुन्हा एकदा नेटिझन्सच्या रोषाला पडली बळी!मुंबईत पोहोचल्यावर प्रियांकाला एका मोठ्या मॅगझिनसाठी फोटोशूट करायचे आहे. शिवाय स्वत:च्या प्रॉउक्शन हाऊसचे काही कामही हातावेगळे करायचे आहे.