Join us  

TikTok चे रेटिंग दिवसेंदिवस ढासळतंय, भारतात काय असणार टिक-टॉकचे भविष्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 1:08 PM

टिक-टॉकला पूर्वी 4.5 चे रेटिंग होते ते आता 1.2 वर आले आहे. प्रत्येक दिवसाला हे रेटिंग आणखी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिक-टॉक काढून टाकले आहे. यावरूनच टिक-टॉकचे भविष्य अंधारात आहे असा अंदाज आपण लावू शकतो.

TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिक-टॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे. ज्या टिक-टॉकला 4.5 चे रेटिंग होते ते आता 1.2 वर आले आहे. कालपर्यंत हे रेटिंग 1.3 होते. पण आज रेटिंग आणखी कमी झाले आहे. प्रत्येक दिवसाला हे रेटिंग आणखी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असेच राहिले तर टिक-टॉकचे रेटिंग लवकरच एक पेक्षा देखील कमी होईल अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. प्ले स्टोरवरचे टिक-टॉकचे रेटिंग एक पेक्षा कमी झाल्यास याचा टिक-टॉकला भारतात मोठा धक्का बसेल यात काहीच शंका नाही. गेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिक-टॉक काढून टाकले आहे. यावरूनच टिक-टॉकचे भविष्य अंधारात आहे असा अंदाज आपण लावू शकतो.

टिक-टॉक प्रकरणावरून आपल्याला अंदाज येतोच आहे की, भारतीय चाहत्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कोणालाही स्टार करू शकतात आणि एका दिवसात फ्लॉप. युट्युब आणि टिक-टॉकच्या सोशल मीडियावरील वॉरमध्ये अनके जणांनी आपला सपोर्ट युट्यूबला देत टिक-टॉक अ‍ॅप डिलीट केले होते. बर्‍याच इंटरनेट युजर्सनी व्हर्च्युअल वॉरमध्ये सामील होत टिक-टॉकवरच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यूट्यूब आणि टिकटॅाक यांच्यात कोण चांगले आहे यावरून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे.

या वॉरची सुरुवात आमिर सिद्दीकी या लोकप्रिय टिक टॉकरच्या व्हिडीओने झाली. आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता. मग काय, प्रसिद्ध युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला त्याच्याच भाषेत उत्तर देत ‘रोस्ट’ केले होते. कॅरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. मात्र तो व्हिडीओ मापदंडाविरोधी असल्याचे सांगत युट्यूबने तो हटवला. त्यानंतर कॅरी मिनाटीने आणखी एक व्हिडिीओ युट्यूबरवर शेअर केला. तो ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

टॅग्स :टिक-टॉक